घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंडरपासच्या कामावरून शिंदेगट आणि भाजपात श्रेयवाद; बॅनरबाजीचे शीतयुद्ध

अंडरपासच्या कामावरून शिंदेगट आणि भाजपात श्रेयवाद; बॅनरबाजीचे शीतयुद्ध

Subscribe

नाशिक : नाशिक शहरात राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्येच श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यामुळे नाशिकमध्ये जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. इंदिरानगर आणि राणे नगर परीसरातील बोगद्याची अर्थात अंडरपासची लांबी वाढवण्यात येणार आहे. यासाठी ४७ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. याचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना, दोघंही सरसावले आहेत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो असलेले बॅनर शिवसेनेने जागोजागी लावले. याचा राग आल्याने भाजपने देखील आमदार देवयानी फरांदे आणि माजी महापौर सतीश कुलकर्णी यांचे बॅनर लावले.

शहरात अनधिकृत होर्डिंग विरोधात महापालिकेकडून कारवाई सुरू असतांना नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्याजवळ भाजप आणि शिवसेनेकडून जागोजागी होर्डिंग लावण्यात आले आहेत. बोगद्याजवळील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ४७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्यावतीने बोगद्याजवळ होर्डिंग लावण्यात आले. त्यानंतर भाजपच्यावतीनेही आमदार देवयानी फरांदे, माजी महापौर सतिश कुलकर्णी यांचे फोटो असलेले होर्डिंग लावण्यात येउन या कामासाठी पाठपुरावा केल्याचे या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात नाशिकमध्ये मात्र श्रेयवादाची लढाई दिसून येत आहे.

- Advertisement -

अर्थात खासदार गोडसे आणि आमदार फरांदे यांच्यातील हा संघर्ष काही नवा नाही. यापूर्वीही के.के. वाघ उडडाणपूलाच्या कामावरूनही हा श्रेयवाद बघायला मिळाला. त्यानंतर स्वातंत्रयवीर सावरकरांच्या चळवळीचे मुख्य केंद्र राहिलेल्या अभिनव भारत मंदिराच्या नुतनीकरण कामाचे उदघाटन झाल्यानंतर खासदार गोडसे यांनी मंदिरासाठी निधी आणल्याचा दावा केला होता. त्यावरूनही भाजप व शिवसेनेत कलगीतुरा रंगला होता. यावेळी आमदार फरांदेंनी खासदार गोडसे यांना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा लोकांची कामे करण्याचा सल्लाही दिला. आता पुन्हा एकदा अंडरपासच्या निधीवरून भाजप शिवसेनेत वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -