घरताज्या घडामोडी'महाराष्ट्राला तोडण्याचे काम सुरू'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर शरसंधान

‘महाराष्ट्राला तोडण्याचे काम सुरू’; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर शरसंधान

Subscribe

नाशिक : महाराष्ट्राला तोडण्याचे राजकारण सुरु असून महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे दोन दिवसांनी लोकेशन दिल्ली असते, प्रत्येक आठवड्यात दोन दिवसांनी दिल्लीला जात आहेत. मग गल्लोगलीत कोण फिरणार? तुमच्या शहरात एक नवा उद्योग आला आहे का? नवीन संधी काही आली आहे का? त्यामुळे तिकीट तिकीट बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्रासाठी एकत्र यायला हवे, कारण धोका तुम्हा आम्हाला नाही तर महाराष्ट्राला आहे असे सांगत शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.

शहरातील सातपूर परिसरात शिवसेना पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाच्या चाळीस आमदारांवर सडकून टीका करत राज्यातील उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. सध्याला देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड, आपण लढत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे ठाकरे म्हणाले. खोके सरकार फक्त घोषणांचे सरकार असून घोषणा दिल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटतं. मात्र सद्यस्थितीत साफ आणि स्वच्छ विरुद्ध गद्दारी असे राजकारण सुरू आहे. राजकारणची दलदल झाली असून आता कोण कोणाचे होर्डिंग्ज लावतो, कोण कोणाचे फोटो, लावतो ते समजत नाही. आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण? आम्हाला राजकारण फोडाफोडीच जमत नाही, आम्ही जनतेचा आवाज ऐकतो, असे ते म्हणाले.

- Advertisement -

आता मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही

अजित पवारही आता महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना अर्थमंत्रिपद देण्यात आलं, यावरून देखील आदित्य ठाकेर यांनी जोरदार टोला लगावला. आतापर्यंत जी कारणं देत होता, त्यांच्याच बाजुला आता तुम्ही जाऊन बसले आहात. अधिवेशनात मी मुद्दामहून गेलो. 40 गद्दार लोकांचे चेहरे पडले होते. 40 मधील 9 मंत्री झाले, पण बाकीच्यांचे काय? आता त्यांचे काय होणार ते कुठे जाणार? मी सांगतो आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. या समोर हा 33 वर्षांचा तरुण तुमच्यासमोर एकटा उभा आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारांना आव्हानं दिले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे

  • उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असते तर सर्व उद्योग महाराष्ट्रातच राहीले असते.
  • फोडाफोडीचं राजकारण थांबविण्यासाठी देशप्रेमी पक्ष एकत्र आले.
  • देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु
  • मणिपुरच्या मुख्यमंत्रयांची हकालपटटी करा
  • मणिपुरमध्ये जवानाच्या पत्नीवर अत्याचार आता कुठे गेली तुमची देशभक्ती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -