घरमहाराष्ट्रManohar Joshi : मनोहर जोशी पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Manohar Joshi : मनोहर जोशी पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Subscribe

मुंबई : माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मुंबईमधील दादर स्मशानभूमीत आज (23 फेब्रुवारी) सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक पक्षांचे राजकीय नेते, शिवसेना कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Manohar Joshi joins Panchtavat The last rites were held in a state ceremony)

हेही वाचा – Raj Thackeray : मनसेच्या इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग नरमले; मुंबईतील शिक्षकांना कामातून वगळले

- Advertisement -

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री 3 वाजून 2 मिनिटांनी वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीयमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष अशा महत्वाच्या पदांवर डॉक्टर मनोहर जोशी यांनी काम केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. प्रकृती अस्वस्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर होते.

ज्येष्ठ राजकारणी मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बाळासाहेबांनी एका ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री केल्याने त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. परंतु, त्यावेळी जोशी यांनी आपल्या कामातून आपली वेगळी छाप पाडली. बालपण-ध्येयाकडे खडतर सुरुवात सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्राने लहानपणापासूनच संघर्ष करून त्यांनी आपल्या जीवनाचा गाडा हाकला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Jitendra Awhad : “वाजवा तुतारी अन् गाडा गद्दारी”; निवडणुकीआधीच आव्हाडांचा नवा नारा

एका खेडेगावात जन्मलेले मनोहर जोशी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केले. 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -