घरमहाराष्ट्रमनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान, म्हणाले - "...मराठे त्यांना अजिबात अडवणार नाहीत"

मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान, म्हणाले – “…मराठे त्यांना अजिबात अडवणार नाहीत”

Subscribe

मराठा आंदोलनाचा मुद्दा पेटत असल्याने आज मंत्रालयात सर्वपक्षीय बैठक पार पडली. परंतु, या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

जालना : मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, या मागणीवर ठाम राहत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनात 25 ऑक्टोबरला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मराठा आंदोलक हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून राज्यातील अनेक भागांत आता जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडू लागल्या आहेत. मराठा आंदोलनाचा मुद्दा पेटत असल्याने आज (ता. 01 नोव्हेंबर) मंत्रालयात सर्वपक्षीय बैठक पार पडली. परंतु, या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. परंतु, यावेळी जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना चर्चेसाठी येण्याचे आव्हान केले आहे. (Manoj Jarange Patil’s open challenge to Devendra Fadnavis to discuss Maratha reservation)

हेही वाचा – “सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे?” मनोज जरांगेंचा थेट सवाल

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांबाबत मत व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण द्या अरे-तुरे बोलण बंद करतो. आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठ्यांमध्ये दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येत आहे तोपर्यंत चर्चेसाठी या. तुम्हाला किती वेळ हवाय ते सांगा. देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावे, रस्त्यांवर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील, असे सांगत जरांगे पाटील पुढे म्हणाले की, पण आज संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे, मग बघू मराठ्यांना कसे आरक्षण देत नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

तर जालन्यातील इंटरनेट सेवा ही कालपासून बंद करण्यात आली आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, इंटरनेट बंद करण्यामागे सरकारचे षडयंत्र असू शकते. पण काळजी करू नका, मराठा समाज तुमच्या नेटवर चालणार नाही, आम्ही लढून मिळू, सरकारने बाजार चाळे करू नयेत, अशा कडक शब्दांत सरकारला सुनावले आहे. तसेच, सरकारकडून आमचा आवाज बंद करण्याचे काम सुरू असेल तर आम्ही जर का मनावर घेतले तर यांचा आवाज 5 मिनिटांत बंद होईल. सरकारचा अध्यादेश आम्हाला मान्य नाही. वेळ घेऊन सरसकट आरक्षण देणार का?. आम्हाला अर्धवट आरक्षण नको. आरक्षण मिळेपर्यंत आमच आंदोलन थांबणार नाही, असे वारंवार मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -