घरमनोरंजनसुधा मूर्ती यांच्या अॅनिमेटेड सिरीज ‘स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा’चे लाँचिंग

सुधा मूर्ती यांच्या अॅनिमेटेड सिरीज ‘स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा’चे लाँचिंग

Subscribe

सुधा मूर्ती यांच्या अॅनिमेटेड सिरीज ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’चा लाँचिंग सोहळा नुकताच संपन्न झाला. छान आशय निर्मिती करण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवणाऱ्या मूर्ती मीडिया या कंटेट प्रोडक्शन हाऊसने तयार केलेल्या ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ या अॅनिमेटेड सिरीजचे लाँचिंग अत्यंत दिमाखदार आणि देखण्या सोहळ्यात पार पडले. ही सिरीज एका युट्युब चॅनेलवर प्रसारीत केली जाणार आहे. या कार्यक्रमाला आबालवुद्धांना आवडतील अशा सुंदर गोष्टी रचणाऱ्या, प्रसिद्ध लेखिका आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्या सुधा मूर्ती, या सिरीजसाठी अॅनिमेशनची निर्मिती करणाऱ्या ‘कॉसमॉस माया’च्या सीईओ मेघा टाटा, प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी आणि प्रसिद्ध संगीतकार शांतनू मोईत्रा यांनी उपस्थिती लावली होती.

शिक्षणासोबतच मुलांची करमणूकही व्हावी हा मूर्ती मीडियाचा प्रयत्न राहिलेला आहे. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ द्वारे लहान मुलांना सकारात्मक पद्धतीने माध्यमांचा आनंद घेता यावा हा प्रयत्न राहिलेला आहे. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ मध्ये लहान मुलांचे मनोरंजन तर होतेच शिवाय त्यांना अनेक गोष्टी शिकताही येतात. या कार्यक्रमात, सुधा मूर्ती यांनी आपल्या आयुष्यातील काही घटना सांगताना गोष्टी सांगण्याचे कसब किती महत्त्वाचे आहे आणि दुर्गम भागातील लहान मुलांनादेखील या गोष्टी पोहचवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या की, “गोष्टी सांगणे ही एक कला आहे, ज्यामुळे लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही ती लक्ष देऊन ऐकतात. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ ही अपर्णा कृष्णन यांची कल्पना आहे. मूर्ती मीडियाने गोष्टी अॅमिनेशनच्या माध्यमातून जिवंत करण्याचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. अपर्णा यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत असून माझ्या कथा मीच पाहणे यासारखा दुसरा आनंद नाही. कथांमधली पात्र डोळ्यासमोर जिवंत होत असलेली पाहून मला फार छान वाटतंय.”

 


हेही वाचा : केदारनाथ धाम यात्रेदरम्यान साराने बनवलं जेवण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -