घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये तोतया समन्वयक?

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये तोतया समन्वयक?

Subscribe

मुख्यमंत्र्यासोबत दुपारी झाले्या बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे तोतया समन्वयक घुसल्चा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक भैय्या पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मराठा आरक्षणावरून आता दिवसेंदिवस वातावरण अधिक तापताना दिसत आहे. त्यामध्ये आता नवीन-नवीन वादांची देखील भर पडत आहे. दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये तोतया लोकांना घेऊन चर्चा झाल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून होत आहे. मुख्यमंत्री आणि नारायण राणेंमध्ये ही बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी मराठा समन्वय म्हणून तोतया लोकांना घेऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप आता मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांकडून होत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापणार का? अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या ‘त्या’ बैठकीवेळी कोण होते?

दरम्यान, नारायण राणे यांच्यासोबत गेलेल्यांची नावे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक भैय्या पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. ‘या कृतीमुळे मराठा समाजात फडणवीस व राणे यांच्या बद्दल असंतोष आहे. परिणामी राणेंची विश्वासार्हता कमी झाली’ असा आरोप भैया पाटील यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केला. बैठकीला गेलेले प्रकाश जगताप हे उस्मानाबादेतील रोमा हॉटेलचे मालक आहेत. जयंत पाटील हे उस्मानाबादचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बलराज रणदिवे हे उस्मानाबादचा पत्रकार संघाचे आणि भाजपाचे पदाधिकारी असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्च्याचे मराठा समन्वयक करत आहेत. तसेच महाराष्ट्र स्वाभिनान पक्षाचे कट्टर समर्थक मानले जाणारे श्याम सावंत आणि राजेश हाटले हे देखील यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

नितेश राणेंचे प्रत्युत्तर

दरम्यान, आरोप करणाऱ्यांच्या प्रश्नाला आम्ही का उत्तर द्यावे? असा सवाल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचे नेते म्हणून गेलो नव्हतो. तर, मराठा म्हणून गेलो होतो. त्यामुळे ज्यांना आरोप करायचे त्यांना करू द्या आम्ही त्यांच्या आरोपाचे उत्तर का द्यावे? अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी ‘आपलं महानगर’कडे दिली.

 

वाचा महिन्याभरात मराठा आरक्षण मिळण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची माहिती

वाचा – मराठा आरक्षण बैठक फियास्को! बैठकीला आंदोलकांचे मोजकेच प्रतिनिधी हजर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -