घरक्रीडासेक्रेड गेम्समधील 'हे' पात्र धोनीला आवडलं

सेक्रेड गेम्समधील ‘हे’ पात्र धोनीला आवडलं

Subscribe

इंटरनेटवर तुफान गाजलेल्या सेक्रेड गेम्स या वेब सिरीजचा पहिला सीजन नुकताच संपला. सिरीजच्या चाहत्यांना आता दुसऱ्या सीजनची उत्सुकता लागली असतानाच सोशल मीडियावर व्हायरल होतय भारताचा माजी कर्णधार धोनीला सेक्रेड गेम्समधील आवडलेल 'हे' पात्र

नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्स या वेब सिरीजने नेटीझन्सना अक्षरश: वेड लावले आहे. त्यात आता व्हायरल होतंय ते धोनीचं सेक्रेड गेम्समधील आवडतं पात्र! सिरीजमध्ये मेन कॅरेक्टर हे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांचं आहे. त्यात प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली ती नवाजुद्दीनला. मात्र भारताचा माजी कर्णधार धोनीला आवडलेल कॅरेक्टर हे ना नवाजुद्दीन आहे, ना सैफ अली खान. तर, धोनीला आवडले आहे राजश्री देशपांडे हीने साकारलेले कॅरेक्टर! या सीरीजमध्ये राजश्री देशपांडे हिने नवाजुद्दीनच्या पत्नीचे कॅरेक्टर साकारले आहे. याची माहिती खुद्द राजश्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

राजश्री ही एक मराठी अभिनेत्री असून तिने सेक्रेड गेम्समध्ये नवाजुद्दीनची पत्नी सुभद्रा गायतोंडे हे कॅरेक्टर साकारले आहे. सिरीजमध्ये राजश्रीचा काम जास्त वेळ नसले तरी तिने केलेल्या कामाला सर्वच स्थरातून पसंती मिळत आहे. त्यात आता धोनीने तिच्या कामाचं कौतुक केल्याने सर्वच स्तरातून राजश्रीच्या कामाची चर्चा होताना दिसून येत आहे.

- Advertisement -

नक्की काय आहे ट्विट?

सेक्रेड गेम्समधील नवाजुद्दीनच्या पत्नीचं कॅरेक्टर साकारलेल्या राजश्री देशपांडेने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर एक पोस्ट टाकली आहे. ज्यात, “जेव्हा धोनीने सांगितले की सेक्रेड गेम्समधील माझा आवडतं कॅरेक्टर तू आहेस तेव्हा मला खूप भारी वाटलं” असं म्हटले आहे. या पोस्टमध्ये राजश्रीने आपला धोनीसोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

- Advertisement -

अनुराग कश्यपचाही ट्विटला रिप्लाय!

राजश्री देशपांडेच्या ट्विटला सेक्रेड गेम्सचा दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही रिट्विट करत रिप्लाय दिला आहे. त्यात अनुरागने “एम. एस. धोनीलाही सेक्रेड गेम्स आवडलेला दिसतोय” असे म्हटले आहे. अनुराग कश्यपने हा रिप्लाय देत राजश्रीच्या ट्विटचा कुठेतरी सेक्रेड गेम्सची जाहिरात करण्यासाठी उपयोग केल्याचा दिसून येतंय.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -