घरदेश-विदेशरुग्णालयात तुंबल पाणी आणि आयसीयूत शिरले मासे

रुग्णालयात तुंबल पाणी आणि आयसीयूत शिरले मासे

Subscribe

देशाची राजधानी जवळ आणि उत्तर भारतातील काही ठिकाणांवर मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसामुळे काही भागातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. बिहार येथे मागील चार दिवसांपासून सततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे पटना येथील नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात पाणी तुंबले आहे. पावसाचे पाणी रुग्णालयाच्या कॅम्पसमध्येच नाही तर रुग्णांच्या वार्डातही पोहचले आहे. पावसाच्या पाण्यांबरोबरच आयसीयूत मासेही फिरत असल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास रुग्णालय प्रशासनाला अडथळा निर्माण झाला आहे. पाणी साचल्यामुळे रुग्णाना वरील मजल्यावर नेण्याचे काम होत सुरु आहे. मात्र रुग्णालयात जागा नसल्यामुळे काही रुग्णांचे बेड पाण्यातच ठेवण्यात आल्या आहेत.


पाणी सतत पडल्यामुळे बेडवरील रुग्णांना कुठेच जाता येत नाही. यामध्ये अनेक रुग्णांची अवस्था गंभीर आहे. पाण्यातील मासे किंवा आलेली घाण या रुग्णालयात पसरली आहे. सध्या रुग्णालयातून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. नालंदा रुग्णालय शहरातील दुसरे मोठे रुग्णालय आहे. याच बरोबर शहरातील अनेक भागांमध्येही पाणी साचले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानूसार आणखी काही दिवस बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश मुसधार पावसाची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रुग्णायाला भेट दिली. लवकरच या रुग्णालयातील पाणी बाहेर काढले जाईल अशी माहिती त्यांनी पत्रकारांना बोलतांना दिली. आसाम, मेघालय, उत्तराखंड, मध्यप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही मुसधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -