घरमहाराष्ट्रमराठा आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका; 20 बसेस जाळल्या, 46 डेपोमधील सेवा बंद, कोटींचे नुकसान

मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका; 20 बसेस जाळल्या, 46 डेपोमधील सेवा बंद, कोटींचे नुकसान

Subscribe

मुंबई : अंतरावली सराटी (Antarwali Sarati) येथे मराठा आंदोलकांवर शुक्रवारी (1 सप्टेंबर) पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मागणीसाठी आंदोलकांकडून उपोषण सुरू असताना लाठीचार्ज झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत बंद पुकारत आंदोलन करण्यात येत आहे. याचा फटका एसटी महामंडळाला (MSRTC ST BUS) बसला आहे. काही ठिकाणी एसटी बस जाळण्यात आल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे एसटी डेपोही पूर्णपणे बंद आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला असून कोटींचे नुकसान झाले आहे. (Maratha Reservation Movement Hits ST 20 buses burnt service stopped at 46 depots loss of crores)

हेही वाचा – मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज पूर्वनियोजीत, गृहमंत्र्यांचे षडयंत्र – माजी खासदाराचा आरोप

- Advertisement -

जालन्यातील घटनेनंतर गेल्या तीन दिवसांत महामंडळाच्या 250 बस डेपोपैकी 46 बस डेपो पूर्णपणे बंद आहेत. या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जाणवला आहे. याठिकाणी बससेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय जाळपोळीच्या घटना घडल्या असून यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या 20 बसेस जाळण्यात आल्या, तर 19 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळाला सुमारे 5 कोटी 25 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे.

तीन दिवसांत एसटी महामंडळाला 8 कोटींचा तोटा

राज्य परिवहन महामंडळाला तिकिटांच्या महसुलात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. याव्यतिरिक्त काही मार्गांवरील सेवा बंद असल्यामुळे आणि इतर भागातील फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाला तिकीट महसुलात मोठा तोटा झाला आहे. गेल्या तीन दिवसांतील हा तोटा आठ कोटी रुपयांच्यावर आहे. याशिवाय, सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत एसटी महामंडळाने एकूण 6,200 सेवा रद्द केल्या आहेत. त्यामुळे महामंडळाचे 2.6 कोटी रुपयांचे अतिरिक्त महसूल बुडाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अंगलट आल्यामुळे माफी मागितली; त्यांच्याकडून मलमपट्टी लावण्याचं काम सुरू; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

असंख्य प्रवासी अडकले

मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाने 14,000 हून अधिक बसेसनी दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांना सेवा दिली. मात्र आंदोलन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे असंख्य प्रवासी अडकून पडले आहेत. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आणि राज्य परिवहन महामंडळाचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी अधिकारी काम करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -