घरमहाराष्ट्रमराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज पूर्वनियोजीत, गृहमंत्र्यांचे षडयंत्र - माजी खासदाराचा आरोप

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज पूर्वनियोजीत, गृहमंत्र्यांचे षडयंत्र – माजी खासदाराचा आरोप

Subscribe

जालना : अंतरावली सराटी (Antarwali Sarati) येथे मराठा आंदोलकांवर शुक्रवारी (1 सप्टेंबर) पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मागणीसाठी आंदोलकांकडून उपोषण सुरू असताना लाठीचार्ज झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत बंद पुकारत आंदोलन करण्यात येत आहे. विरोधकाकंडून या हल्ल्यासाठी गृहमंत्र्यांना जबाबदार धरलं जात आहे. मात्र सरकारकडून असा कोणताही आदेश देण्यात आला नव्हता, असं सांगण्यात आले आहे.  असे असले तरी आंदोलकांवरील लाठीचार्जप्रकरणी माजी खासदाराने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Lathi charge on Maratha protesters pre planned conspiracy by Home Minister ex Khasdar alleges)

हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हटले की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली या गावामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मारहाण करण्यात आली. महिलांवर, लहान मुलांवर, वृद्धांवर लाठीचार्ज करण्यात आला. हे सर्वकाही पूर्वनियोजीत होतं. आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचं षडयंत्र हे देवेंद्र फडणवीस यांचच आहे. त्यांनीच ते घडवून आणलं आहे, असा गंभीर आरोप सुभाष वानखेडे यांनी केला आहे.

- Advertisement -

सुभाष वानखेडे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मनुवादी असून ते मराठा समाजाचे कट्टर विरोधक आहेत. जालन्यातील घटनेनंतर संबंध महाराष्ट्रात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. या घडलेल्या सर्व गोष्टींची फडणवीस यांना पूर्वकल्पना होती. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी कट रचला. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सुभाष वानखेडे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मराठा उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रालयातून फोन आल्यानंतर लाठीमार करण्यात आला, असे वातावरण विरोधकांकडून तयार केले जात आहे. पण मी सांगतो की, हे सर्व निर्णय एसपी आणि डीवायएसपी पातळीवर घेतले जातात. ज्या 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले, तेव्हा कोणी आदेश दिले होते?, मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले होते, तेव्हा कोणी आदेश दिले होते? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -