घरमहाराष्ट्रMaratha Reservation : ओबीसीमधून नव्हे तर वेगळ्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन - भुजबळ

Maratha Reservation : ओबीसीमधून नव्हे तर वेगळ्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन – भुजबळ

Subscribe

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यांचा हा लढा अद्यापही सुरू असला तरी 26 जानेवारीला त्यांच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करत ‘सगेसोयरे’बाबत अध्यादेश काढला आहे. यानंतर सगेसोयरेच्या अध्यादेशासाठी राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. याचपार्श्वभूमी आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे येत्या 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. याचसंदर्भात बोलताना ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की, विशेष अधिवेशन मराठा समाजाला ओबीसीमधून नाही तर वेगळं आरक्षण देण्यासाठी बोलावले आहे. (Maratha Reservation Special convention for separate reservation not from OBC Chhagan Bhujbal)

हेही वाचा – Bhujbal vs Manoj Jarange : श्रेय घेण्यासाठीच जरांगेंचे उपोषण; भुजबळांचा हल्लाबोल

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी विचारण्यात आले की, 20 तारखेला विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मार्ग मार्गी लागले असे वाटते का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, एक दिवसाचं अधिवेशन आहे आणि एका दिवसात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. कारण कोणी विरोध करेल असे मला वाटत नाही. त्यादिवशी काही जण भाषण करतील, पण विरोध कोणी करणार नाही. कारण सर्वांचीच मागणी त्यांना ओबीसीमधून नाही तर वेगळं आरक्षण द्या.

याचपार्श्वभूमीवर भुजबळ यांना विचारण्यात आले की, मनोज जरांगे यांची ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे? यावर ते म्हणाले की, देणारच नाही आणि ते शक्यही नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, मराठा समाज हा ओबीसी समाज नाही. परंतु कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मराठा समाज ओबीसीमध्ये येत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. ओबीसींच्या 374 लोकांमध्ये तुम्ही येऊ नका, तुम्ही तुमचं वेगळं आरक्षण घ्या, असे छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याने दिला राजीनामा; शिंदे गटात जाणार?

श्रेय घेण्यासाठीच जरांगेंचे उपोषण

मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सर्वांना वाटलं होतं की, मराठा आरक्षण 15 तारखेला येईल. मनोज जरांगे यांना वाटलं असेल की, 15 तारखेला मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार आहे, तर आपण उपोषणाला बसावं. म्हणजे त्यांना त्याचं श्रेय सुद्धा मिळू शकतं. त्यांची समज काय चुकीची नाही आहे. 10 तारखेला आपण उपोषणाला बसू आणि 15 तारखेला आरक्षण मिळालं तर आपल्याला दुसऱ्यांदा गुलाल उधळता येईल. परंतु ते काम पूर्ण झालं नाही. ते 5 ते 7 दिवस पुढे गेले आहे. त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -