घरमुंबईCM Eknath Shinde : महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

CM Eknath Shinde : महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

Subscribe

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मिलिंद देवरा यांच्या रुपाने महायुतीचं पारडं जड होणार. त्यांचा सर्व स्तरातील संपर्क आमच्या कामाला येईल. पक्ष मजूत होईल. राज्य सभेच्या खासदारकीमुळे पक्ष मजबूत होईल. दिवगंत बाळासाहेब ठाकरे ठाकरे मुरली देवरा याचेसुद्धा स्नेहाचं संबंध होते.

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज महायुतीच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार मिलिंद देवरा यांनीसुद्धा अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते. (CM Eknath Shinde All Grand Alliance candidates will be elected Faith in Chief Minister Shinde)

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मिलिंद देवरा यांच्या रुपाने महायुतीचं पारडं जड होणार. त्यांचा सर्व स्तरातील संपर्क आमच्या कामाला येईल. पक्ष मजूत होईल. राज्य सभेच्या खासदारकीमुळे पक्ष मजबूत होईल. दिवगंत बाळासाहेब ठाकरे ठाकरे मुरली देवरा याचेसुद्धा स्नेहाचं संबंध होते. 1976 मध्ये मुरली देवरा हे महापौर पदाचे उमेदवार होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली. असे ऋणानूबंध बाळासाहेब ठाकरे आणि देवरा कुटुंबीयांचे होते.

- Advertisement -

आणि आज मिलिंद देवरा हे शिवसेने उमेदवार आहेत. शिवसेना वाढविण्यासाठी याचा नक्की मदत होईल. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. आमच्याकडे बहुमत आहे. ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते. एक उच्च शिक्षित उमेदवार असलेले मिलिंद देवरा यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अनूभव आहे. त्यांचा हा अनूभव राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला मोठं करण्यास नक्कीच मदतीचं ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Bhujbal vs Manoj Jarange : श्रेय घेण्यासाठीच जरांगेंचे उपोषण; भुजबळांचा हल्लाबोल

- Advertisement -

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांनाच उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार ठरविण्यासाठी अजित पवार गटाची बैठक मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पार्थ पवार, बाबा सिद्दीकी, अविनाश आदिक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

हेही वाचा : Congress Meeting : आमचे सर्व आमदार पक्षासोबत, पक्षफुटीच्या चर्चांना थोरातांकडून पूर्णविराम

काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राजकीय जीवनामध्ये काही घडामोडी स्वीकाराव्या लागतात. आता माझी टर्म चालू असतानाही मी परत फॉर्म का भरला आहे? त्याच्याविषयी लोक तर्कविर्तक लावत आहेत. त्यासंदर्भात मला एवढंच म्हणायचं आहे की, काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या. आम्हाला राजकीय जीवनामध्ये काम करत असताना काही घडामोडी स्वीकाराव्या लागतात. आमच्याकडे खूप इच्छूक लोक आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की, आम्ही आज का फॉर्म भरलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -