Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Maratha Reservation: लढा आणखी व्यापक होणार; मराठा तरुणांनो..., काय म्हणाले जरांगे पाटील

Maratha Reservation: लढा आणखी व्यापक होणार; मराठा तरुणांनो…, काय म्हणाले जरांगे पाटील

Subscribe

मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, त्यांना कळकळीची विनंती आहे, नाहीतर आमच्या उपोषणाचा, आंदोलनाचा फायदा काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तरसोबतच सरकारला आंदोलन अधिक व्यापक होणार असल्याचं म्हणत इशारा दिला आहे

जालन्यात झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण पुकारलं आहे. त्यांनी सरकारला चार दिवसांचा दिलेला अल्टीमेटम उद्या संपणार आहे. सुधारित जीआर काढण्याची त्यांची मागणी आहे. परंतु त्याआधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेत, मराठा तरुणांना आवाहन केलं आहे तर सरकारला इशारादेखील दिला आहे. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, त्यांना कळकळीची विनंती आहे, नाहीतर आमच्या उपोषणाचा, आंदोलनाचा फायदा काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तरसोबतच सरकारला आंदोलन अधिक व्यापक होणार असल्याचं म्हणत इशारा दिला आहे. ( Maratha Reservation The Fight Will Be Broader Maratha youth what did Manoj Jarange Patil )

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे. यावेळ ते म्हणाले की, मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावत आहोत. या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणानं घ्यावा, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -

जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आज मुंबईला रवाना होणार आहेत. या शिष्टमंडळात 13 तज्ज्ञ आणि 8 गावकऱ्यांचा समावेश असणार आहे. सरकार जर अध्यादेशात बदल करून देणार असेल तर आम्हीही दोन पावलं मागे येण्यास तयार असल्याचं ते म्हणाले.

मराठा तरुणांना आवाहन…

आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता बळावली असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. या आंदोलनाला कुठेही गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य मराठा समाजाच्या तरुणांनी करू नये, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा : मुख्यमंत्री साहेब आपण वेळात वेळ काढून… रोहित पवार यांची बोचरी टीका )

- Advertisment -