घरमहाराष्ट्रMaratha Reservation : रस्ता रोको आंदोलन होणार, पण...; जरांगे पाटलांनी दिला 'हा'...

Maratha Reservation : रस्ता रोको आंदोलन होणार, पण…; जरांगे पाटलांनी दिला ‘हा’ इशारा

Subscribe

मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांचा विचार करत आज 11 ते 01 या वेळेत रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुपारी 1 वाजेनंतर या रास्ता रोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे.

जालना : राज्य सरकारकडून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयावर मराठा आंदोलक नाखूश पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वीच मराठा आंदोलकांना रस्ता रोको करण्याचे आवाहन केले होते. त्याशिवाय हे रस्ता रोको करताना मराठा आंदोलकांनी त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, असे आवाहनही केले. परंतु, या रस्ता रोको आंदोलनात काहीसा बदल करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांच्याकडून घेण्यात आला आहे. (Maratha Reservation: There will be road block movement, but…; Manoj Jarange Patil gave this warning)

हेही वाचा… Maratha Reservation : वैयक्तिक वादात सरकारला ओढू नये; जरांगे- बारसकर वादावर शिंदे गटाची भूमिका

- Advertisement -

12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांना किंवा अन्य कोणालाही त्रास होईल, अशा प्रकारचे आंदोलन करू नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे जरांगे यांनी विद्यार्थ्यांचा विचार करत आज (ता. 24 फेब्रुवारी) 11 ते 01 या वेळेत रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुपारी 1 वाजेनंतर या रस्ता रोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे. परंतु, दोन तास करण्यात येणारा रस्ता रोको हा शांततेत करण्यात यावा, असेही मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आंदोलकांना सांगण्यात आले आहे.

आंदोलनाबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आधीच्या काळात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर राजाला दया यायची, पण आता तीन-चार राजे असल्याने त्यांना आंदोलन करणाऱ्यांबाबक काहीच वाटत नाही. त्यामुळे आता  मराठा रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज झाला आहे. पण आजपासून राज्याभरांत गावागावांत होणारा रास्ता रोको हे शांततेत करावे. त्यानंतर गुन्हे कसे दाखल करण्यात येतात? ते पाहून घेऊ. त्यामुळे आज 11 ते 1 या वेळेतच रस्ता रोको आंदोलन करा, 04 ते 07 या वेळेत आंदोलन करू नका. पण 1 वाजेच्यानंतर या आंदोलनाचे रुपांतर हे धरणे आंदोलनात करा. उद्यापासून रस्ता रोको होणार नाही, असा महत्त्वाचा निर्णयही जरांगे यांच्याकडून घेण्यात आला आहे.

अंतरवालीत उद्या निर्णायक बैठक…

उद्या रस्ता रोको आंदोलन न करता मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना अंतरवाली सराटी गावात येण्याचे आवाहन केले आहे. कारण उद्या रविवारी (ता. 25 फेब्रुवारी) मराठा समाजाची निर्णायक बैठक घेण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. दुपारी 12 ते 01 या वेळेत ही बैठक घेण्यात येईल. ही मराठा समाजाची निर्णायक बैठक असणार असल्याचेही जरांगे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उद्याच्या बैठकीत जरांगे यांच्याकडून सरकारकडून मराठा समाजाविरोधात नेमका काय डाव आखण्यात येत आहे. उद्यापासून नेमके काय काय करायचे याचाही बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

‘या’ कारणांमुळे रस्ता रोको स्थगित…

नाशिकला बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे. आम्ही सर्व समाजाला मानणारे आहोत. पाठीमागच्या सारखे कोणी जाळपोळ करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या मुलांना अडचण नको, म्हणून आंदोलनात बदल करण्यात आले आहे. 3 मार्चला अंतिम रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आज दुपारनंतरच धरणे आंदोलनात रूपांतर करण्यात येईल. सरकार रडीचा डाव खेळत आहे. रास्ता रोकोचा जे स्थळ असेल त्या ठिकाणची आमची जबाबदारी, इतर ठिकाणी आमची जबाबदारी नाही, असे मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -