घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरुन मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवून देऊ -...

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरुन मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवून देऊ – विनायक मेटे

Subscribe

मराठा समाजाचे आंदोलन दडपण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला

मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने तयार केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणावर आलेल्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात आरोपांच्या फैरी झडल्या आहेत. मराठा समाजातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्याविरोधात मोर्चा काढण्यासाठी मराठा समाजाच्या बैठका घेतल्या जात आहेत. मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी मराठा आंदोलकर रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यात भगवा वणवा पेटणार असलाचा इशारा मराठा सामाजाकडून देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे. महाविकस आघाडी सरकार खोटे आहे. जेव्हा त्यांना एसईबीसी विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यासाठी सांगितले तेव्हे विद्यार्थ्यांना कोर्टात जाण्यासाठी सांगण्यात आले. मराठा आरक्षण रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण कायेशीर उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. यांच्यामुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिले असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मराठा समाजाचे आंदोलन दडपण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या सरकारने अजूनही ईडब्लूएसचे आरक्षण लागू केले नाही. सारथीचे विद्यार्थी पीएचडी करत असून त्यांना अजून फेलोशिप देण्यात आली नाही. मराठा आरक्षणाविषयी मराठा समाज ५ जूनला बीडमध्ये मराठा मोर्चा काढणार आहेत. मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये मराठा समाजातील लोकं उतऱणार आहेत. मुंबईतही आंदोलन करण्यात येणार आहे. वणवा पेटणार असून सरकारला मराठा समाजाची ताकद काय आहे ते दाखवून देऊ असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.

मोर्चे काढण्याची ही वेळ नाही – संभाजीराजे

मराठा आरक्षणावर माजी भूमिका सकारात्मक असेल. मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करतो आहे. या चर्चेनंतरच पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे ही मोर्चे काढण्याची योग्य वेळ नाही. त्यामुळे लवकरच मराठा आरक्षणाविषयाची भूमिका स्पष्ट करु असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -