घरमहाराष्ट्रबोलतो मराठी...!

बोलतो मराठी…!

Subscribe

२०११ च्या जनगणनेनुसार देशात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या मातृभाषेचा अहवाल समोर आला आहे. त्या अहवालानुसार मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर आली असून २००१ च्या अहवालात ती चौथ्या क्रमांकावर होती.

आधुनिकतेकडे देशाची वाटचाल जोरदार सुरू असताना यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीयांना आपल्या मातृभाषेचा विसर पडला असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. ठिकठिकाणी व्यावहारासाठीही इंग्रजी भाषात बोलली जात आहे. नुकताच २०११ चा जनगणना अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार देशात आपापल्या मातृभाषेत बोलणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २००१ मध्ये हिंदी भाषिकांची आकडेवारी ४१.०३ टक्के होती. ती यंदा ४३.६३ टक्क्यावर आला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात हिंदी भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत सरासरी ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधीक प्रमाणात मातृभाषेत बोलणाऱ्यापैकी हिंदी भाषा पहिल्या स्थानावर आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे पूर्वीपेक्षा यंदाच्या आकडेवारीत मराठी भाषेचे स्थान एक पाऊल पुढे सरकले आहे. मराठी भाषा चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आली आहे. मराठी भाषेने तेलूगू भाषेला मागे टाकत ही जागा मिळवली आहे.

महाराष्ट्रात इंग्रजी भाषिक जास्त

hand-like
इंग्रजी भाषेला प्राधान्य (सौजन्य-प्रहार )

हिंदी पाठोपाठ बंगाली भाषेने दुसरा क्रमांक पटकावला असून संस्कृत ही सर्वात कमी बोलणारी भाषा असल्याचे आकडेवरीतून समजते. त्याशिवाय बोडो, मणिपूर, कोकणी आणि डोंगरी भाषाही त्या त्या भाषिकांच्या लोकसंख्येनुसार वापरली जाते. देशातील साधारण २.६ लाख लोकांनी इंग्रजीला पहिली बोली भाषेचे स्थान दिले आहे. त्यातील १ लाख भाषिक हे केवळ महाराष्ट्रातीलच आहेत. इंग्रजीही प्रथम भाषा वापरणाऱ्यांमध्ये तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कर्नाटका तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार उर्दू भाषा सातव्या क्रमांकावर असून गुजरातमध्ये उर्दू भाषेला सहाव्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -