घरदेश-विदेशरूपयाची आतापर्यंतची निचांकी घसरण; महागाईला आवतण

रूपयाची आतापर्यंतची निचांकी घसरण; महागाईला आवतण

Subscribe

डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाने आतापर्यंतची सर्वात खालची म्हणजेच नीचांकी घसरण गाठली आहे. कालच १९ महिन्यानंतरची रुपयाची सर्वात मोठी घसरण झाली होती. रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर शेअर बाजारातही घसरण सुरु झाली आहे.

डॉलर ६९ रुपयांवर

आतापर्यंत पहिल्यांदाच रुपयाने ६९ रुपयांचा तळ गाठला आहे. आज सकाळी २८ पैशांच्या घसरणीने रुपया एका डॉलरच्या तुलनेत ६८ रुपये ८९ पैशांवर होता. त्यानंतर तो ६८.९९ वर पोहोचला आहे. कालच्या दिवसात रुपयाची ३६ पैशांनी घसरण होऊन तो ६८.६१ स्थिर झाला होता. डॉलरच्या तेजीमुळे रुपयावर दबाव वाढत चालला आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे हा दबाव कायम राहील, अशी शक्यता आहे. याआधी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी ६८.६८ रुपयांची घसरणीसह रुपयाची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली होती.

- Advertisement -

सेंसेक्समध्ये ९७ अकांची घसरण

रुपयाच्या अवमूल्यनामुळे सेंसेक्समध्ये ८१ अकांची घसरण होऊन बाजार सध्या ३५,११९ वर आहे. तर निफ्टीत ४९.९५ ची घसरण होऊन १०,६२१ वर सध्या बाजार सुरु आहे. यामुळे मोठमोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सकाळपासून काही टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

सामान्य माणसांवर काय परिणाम होणार

– भारतासाठी लागणारे एकूण इंधनापैकी ८० टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात करतो

- Advertisement -

– रुपयाच्या घसरणीमुळे पेट्रोलियम पदार्थ आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

– पेट्रोलियम कंपन्या इंधनाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

– डिझेलचे दर वाढल्यास माल वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो

– त्याशिवाय भारत देश मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल आणि विविध डाळींचीही आयात करतो. त्यामुळे या वस्तूंचेही दर वाढण्याची शक्यता आहे.

– एकूणच रुपयाचे अवमूल्यन हे महागाईला आवतण देणारे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -