घरताज्या घडामोडीमराठी माणसाला नाकारणारा गुजराती अहंकार मोडून काढणार; रोहित पवार राज्य सरकारवर कडाडले

मराठी माणसाला नाकारणारा गुजराती अहंकार मोडून काढणार; रोहित पवार राज्य सरकारवर कडाडले

Subscribe

बारामती (पुणे) – राज्यातील आणि केंद्रातील सरकार आपल्या सोबत आहे, याचा अतिआत्मविश्वास सध्या गुजरातींमध्ये वाढला आहे. त्यातूनच मराठी माणसाचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरगावमध्ये मराठी माणसालाच नोकरी नाकारण्याचा उद्दामपणा गुजरातींकडून सुरु असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. ते सोमवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या मुंबईत सुरु असलेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादावर भाष्य केले.

बारामती लोकसभेसाठी उद्या (7 मे, मंगळवार) मतदान होणार आहे. येथील जाहीर प्रचार रविवारी संपला. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मुंबईतील गुजराती माणसाचा आत्मविश्वास सध्या अति झाला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, राज्यातील आणि केंद्रातील राजकारणी आपल्या पाठिशी आहेत. याच अतिआत्मविश्वासातून दक्षिण मुंबईत मराठी माणसांना नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना दुर्दैवी असल्याचे रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

गुजराती माणसामध्ये सध्या अहंकार जास्त झाला आहे. त्याला राज्यातील आणि केंद्रातील सरकार कारणीभूत आहे. या अहंकारातूनच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले गेले आहे. आणि आता मराठी बहुल भाग असलेल्या गिरगावमध्ये मराठी माणसालाच नोकरीसाठी अर्ज करु नये असे बजावले जात असल्याचे रोहित पवार म्हणाले. मराठी माणसाला आता हा अहंकार मोडून काढावा लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

मुंबईतील एका कंपनीतील एचआर जान्हवी सराना हिने तिच्या संस्थेत एका ग्राफिक डिझायनरच्या रिक्त पदासाठी लिंक्डइनवर जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये त्या एचआरने त्यांना या पदासाठी कशा प्रकारचा उमेदवार हवा आहे, याबाबतची माहिती दिली. परंतु. या जाहिरातीच्या सुरुवातीलाच त्या एचआरने मराठी माणसाला इथे अर्ज करण्यास परवानगी नाही किंवा मराठी माणूस इथे अर्ज करु शकत नाही, अशी अट घातल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, जान्हवी सराना ही एचआर गुजरातची एक फ्रीलांस रिक्रुटर आहे. ज्यामुळे याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा : Lok Sabha 2024 : मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? गुजराती रहिवाश्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारला

सोशल मीडियावर गदारोळ

जान्हवी सराना या कंपनीच्या एचआरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. X या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक नेटकऱ्यांनी या जाहिरातीचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी या एचआरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हे पाहता काही काळानंतर ती पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आली आहे. पण तरी देखील त्या एचआरला ट्रोल करणे सुरूच आहे. तर या एचआरने माफीची पोस्ट करून देखील तिच्या विरोधात तक्रार करा, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : BSNL: कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वावर संकटांचे ढग; सरकारकडे मदतीचे आवाहन

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -