घरमहाराष्ट्रनंदुरबारमधील ट्रॅक्टरच्या शोरुमला भीषण आग; 20 ट्रॅक्टर्स जळून खाक

नंदुरबारमधील ट्रॅक्टरच्या शोरुमला भीषण आग; 20 ट्रॅक्टर्स जळून खाक

Subscribe

नंदुरबारमधील शहादा येथील राज मोर्टर्स या ट्रॅक्टरच्या शोरुमला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात 20 ट्रॅक्टर्स जळून खाक झाले.

नंदुरबारमधील शहादा येथील राज मोर्टर्स या ट्रॅक्टरच्या शोरुमला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात 20 ट्रॅक्टर्स जळून खाक झाले. आग लागण्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.  ( Massive fire at tractor showroom in Nandurbar 20 tractors burnt )

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले आहे. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. नंदुरबारमधील राज मोटर्स या ट्रॅक्टर्सच्या शोरुमला आग लागल्याने त्यात 20 ट्रॅक्टर्स जळून खाक झाले आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: मोठी बातमी! ठाण्यात सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग, काही नागरिक आडकल्याची भीती )

ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्क जळून खाक

ठाण्यात सिनेवंडर मॉलजवळ असलेल्या इमारतीला भीषण आग लागली होती. या व्यवसायिक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

- Advertisement -

कोरियन बिझनेस पार्कला आग लागल्याने संबंधित परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. रात्रभर या मार्गाने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच, कोरियन बिझनेस पार्कमध्ये स्पोर्ट्स होत असतात. या आगीत इमारतीच्या आत पार्क केलेली 10 ते 12 वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -