घरराजकारणश्रीसदस्यांचा मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीत? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला सवाल

श्रीसदस्यांचा मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीत? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला सवाल

Subscribe

मुंबई | ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात खरच किती जण मृत्युमुखी पडले? आणि श्रीसदस्यांचा मृत्यू उष्मघातानी की चेंगराचेंगरीत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत राज्य सरकारला केला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नवी मुंबईतील खारघर येथे पार पडला. हा सोहळा पाहाण्यासाठी लाखोच्या संख्यने श्रीसदस्य उपस्थित होते. या सोहळ्याची वेळ दुपारची असल्यामुळे श्रीसदस्यांना ( Shri Sadasya) भर उन्हात बसावे लागले होते. यामुळे १४ श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

या दुर्घटनेवरून जितेंद्र आव्हाडांनी दोन ट्वीट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. जितेंद्र आव्हाडांनी पहिल्या ट्वीटमध्ये अनेक सवाल उपस्थित करत राज्य सरकारला घेरले आहे.  जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “खरे सांगा … काल खरच किती जण मृत्युमुखी पडले … ….. मृत्यू उष्मघातानी की चेंगराचेंगरीत …. ….. आयोजक सरकार होते … लपवा लपवी करू नका …… जबाबदारीचा स्वीकार करा … …… cctv footage ताब्यात घ्या आणि जनतेला दाखवा …… उच्च न्यायालयाच्या न्यायदिशा चा चौकशी आयोग नेमावा….”, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये चेंगराचेंगरीचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “समाज माध्यमां मधून हा वीडियो आला आहे हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंग्रीचा प्रकार कुठे घडला असावा ?”, असे प्रश्न त्यांनी विचारले.

- Advertisement -

दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी – अंबादास दानवे

“या दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी. मृतांच्या नातेवाईकांना रुपये ५ लाख ऐवजी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी”, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. या पत्रात अंबादास दानवे म्हणाले, “या दुर्घटनेत १४ श्रीसदस्यांना जीव गमवावा लागला. यामुळे आयोजकांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या सोहळ्याबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटीची तातडीने उच्च स्तरीय चौकशी करावी. तर मृतांच्या वारसदारांपैकी एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्य करून घ्यावे”, अशी मागणी अंबादास दानवे यांनी लेखी पत्रातून केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -