घरठाणेमोठी बातमी! ठाण्यात सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग, काही नागरिक आडकल्याची भीती

मोठी बातमी! ठाण्यात सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग, काही नागरिक आडकल्याची भीती

Subscribe

ठाण्यात सिनेवंडर मॉलजवळ असलेल्या इमारतीला भीषण आग लागली आहे. आग लागल्याने संबंधित परिसरात काही नागरिक आडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

ठाण्यात सिनेवंडर मॉलजवळ असलेल्या इमारतीला भीषण आग लागली आहे. आग लागल्याने संबंधित परिसरात काही नागरिक आडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास समोर आली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. (Massive fire near Cine Wonder Mall in Thane citizens feared trapped)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील माझिवाडा सर्कल येथे असलेल्या कोरियन बिझनेस पार्कला आग लागली आहे. बिझनेस पार्कच्या तळमजल्यापासून चौथ्यामजल्यापर्यंत आग पसरत गेली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

कोरियन बिझनेस पार्कला आग लागल्याने संबंधित परिसरातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच, कोरियन बिझनेस पार्कमध्ये स्पोर्ट्स होत असतात. दरम्यन, कोरियन बिझनेस पार्कला आग लागलेली आग ही शेजारीच असलेल्या सिनेवंडर मॉलच्या टॉप फ्लोअरवर पसरली आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी चार ते पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्नीशमन दालाच्या जवानांकडून केले जात आहे. तसेच, पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आजुबाजूच्या स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तेव्हा आम्ही शिंदे गटातील गद्दारांच्या मनातील मळमळ बाहेर काढण्यासाठी प्रयोग केलेला – अमोल मिटकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -