घरताज्या घडामोडीMumbai Rains: मातोश्री, कलानगर २०२४पर्यंत पूरमुक्त; १६ कोटी रुपये खर्चून पंपिंग व्यवस्था...

Mumbai Rains: मातोश्री, कलानगर २०२४पर्यंत पूरमुक्त; १६ कोटी रुपये खर्चून पंपिंग व्यवस्था उभारणार

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री, कलानगर परिसराला २६ जुलै २००५ पूरस्थितीचा मोठा फटका बसला होता. मात्र या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेने या परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा जलद गतीने निचरा करण्यासाठी भाडे तत्वावर पंपिंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६ कोटींचा खर्च येणार असून मातोश्री, कलानगर परिसराला २०२४ पर्यंत मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई शहर हे सात बेटांनी बनलेले आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहिल्यास शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी सखल भाग आहे. या मुंबईत दरवर्षी सरासरी २२०० मिमी इतका पाऊस पडतो. मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ही प्रतितास ५०-६० मिमी पाऊस पडल्यास साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याइतकीच आहे. त्यामुळे मुंबईत पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास आणि त्याचवेळी समुद्राला मोठी भरती असल्यास मुंबईतील सांडपाणी समुद्रात वाहून नेणारी पातमुखे बंद केली जातात. परिणामी कुर्ला, घाटकोपर, किंग्जसर्कल, हिंदमाता, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, वांद्रे, परळ, सायन, वडाळा आदी सखल भागात कमी-अधिक प्रमाणात पाणी साचते. पालिकेने ब्रिटानिया, इर्ला, हाजीयाली, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड आणि मोगरा या सहा ठिकाणी उभारलेल्या जास्त क्षमतेच्या पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात येतो.

- Advertisement -

मात्र काही लहान-मोठ्या सखल भागातील पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी त्या त्या क्षमतेचे पंप भाडे तत्वावर घेण्यात येतात. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत अतिवृष्टी आणि समुद्रातील मोठ्या भरतीमुळे मुंबईमध्ये मिठी आणि अन्य नद्यांना पूर येऊन मुंबईची तुंबई झाली होती. तेव्हा मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तीय हानी झाल्यानंतर मुंबई महापालिका खडबडून जागृत झाली. भविष्यात अशी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पलिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला. मुंबईतील महत्त्वाच्या नद्या आणि नाले यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले. तर सात ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी जास्त क्षमतेचे पंपिंग स्टेशन बांधण्याचे काम हाती घेऊन त्यापैकी ६ पंपिंग स्टेशन आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्चून १७ वर्षांच्या कालावधीत उभारण्यात आले.

वांद्रे कलानगर येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि आताचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यालाही २६ जुलैच्या पूरस्थितीचा मोठा फटका बसला होता. आतापर्यंत मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी युतीचे गणित बिघडल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना हाताशी धरून आणि त्यांना सत्तेचा वाटा देऊन मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने आता दर पावसाळ्यात मातोश्रीचे पावसाळ्यात पूरस्थितीपासून वाचविण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे राज्य शासन आणि मुंबई महापालिका प्रशासन यांची जबाबदारीच ठरली आहे.

- Advertisement -

२६ जुलै २००५ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेने मातोश्री परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा जलदगतीने निचरा करण्यासाठी १६ कोटी रुपये खर्चून भाडेतत्त्वावरील पंपिंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मातोश्री आणि कलानगर परिसराला २०२३ पर्यंत मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, मातोश्री परिसरात मिठी आणि वाकोला नदीचा प्रवाह उलटून जलमय स्थिती होऊ नये यासाठी कलानगर परिसरातील पातमुखांवर पेनस्टॉक प्रकारचे १० गेट्स बसविण्यात येणार आहेत.

गतवर्षीसुद्धा असे गेट्स आणि दोन वर्षांसाठी भाडे तत्त्वावरील पंपिंग व्यवस्था वापरण्यात आली. या भाडे तत्त्वावरील पंपिंगचा कंत्राटं कालावधी संपुष्टात आल्याने नवीन कंत्राटदार नेण्यात येत आहे. महाबळ इन्फ्रा इंजिनिअर्स या कंत्राटदाराला हे कंत्राटकाम १६ कोटी ६६ लाख रुपये दरात करण्यात येणार आहे. सदर कंत्राटदार हे काम २५ मे २०२२ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पूर्ण करणार आहे.


हेही वाचा – गृहमंत्री आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, गृहमंत्र्यांनी केला खुलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -