घरताज्या घडामोडीकोरोनाचे नियम न पाळणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींना भीती वाटत नाही का?, महापौर किशोरी...

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींना भीती वाटत नाही का?, महापौर किशोरी पेडणेकरांचा सवाल

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी सध्या कमी झाला असला तरी अद्यापही संपलेला नाहीये. बॉलिवूड किंवा राजकीय लोकांनी त्रिसूत्री नियम तरी पाळले पाहीजेत. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं महत्त्वाचं आहे. कारण ओमिक्रॉनचा धोका आता वाढताना दिसतोय. ओमिक्रॉन वाढत राहिल्यास राज्यांवर निर्बंध लादण्यात येणार असल्याचं पीएम मोदींनी काल सांगितलं. परंतु लाईमलाईटमध्ये असलेल्या लोकांना भिती का वाटत नाही. असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आला. तसेच येथील मॅनेजमेंटला देखील फोन करण्यात आला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींना ट्रेसिंग केलं आहे. दोघांचेही कॉन्टॅक्ट चेक केले जात आहेत. घरी क्वारंटाईन होऊ असं सांगण्यात आलंय. घरी क्वारंटाईन करण्यात आलं असून मुंबईची महापालिका सुद्धा सज्ज आहे. परंतु बॉलिवूड सह राजकीय लोकांनी सुद्दा काळजी घेतली पाहीजे. असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉन व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली

कोविड-१९ चा धोका अद्यापही कमी झालेला नाही. दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राजकीय, बॉलिवूड आणि इतर लोकांनीही जर काळजी घेतली नाही. तर मृत्यूचा धोकाही ओढावण्याची शक्यता असते. ग्रँड हयात पार्टीमध्ये काही प्रसिद्ध मुलांची नावे समोर आली आहेत. परंतु त्यांनी देखील स्वत:ची आणि घरातील लोकांची काळजी घेतली पाहीजे. असं पेडणेकर म्हणाल्या.

हॉटेलच्या निर्बर्धांचं पालन केलं जात नाहीये

हॉटेलच्या निर्बंधांबाबत प्रश्न विचारला असता महापौर म्हणाल्या की, हॉटेलसाठी यापेक्षाही अधिक कडक निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत. कारण जर आपण हॉटेल किंवा इतर गोष्टींवर बंदी घातली असता लोकं राज्य सरकार, महापालिका आणि केंद्र सरकारच्या नावाने खापर फोडतात. मात्र, आपण इतर राज्यांच्य़ा तुलनेत हळूपारपणे पुढे पाऊल टाकलं. त्यामुळे आपण राज्यात एकदाच लॉकडाऊन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनवर योग्य निर्णय घेतला होता.

- Advertisement -

हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का, हिटमॅनच्या हाताला गंभीर दुखापत


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघींचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर बॉलिवूडकरांनी पार्ट्या आयोजित करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे करिना आणि अरोरा यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -