घरताज्या घडामोडीomicrone south africa :ओमिक्रॉनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना जीवे मारण्याची धमकी

omicrone south africa :ओमिक्रॉनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

दक्षिण आफ्रीकेच्या ज्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट ओमीक्रॉनचा शोध लावला त्यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा (Cyril ramaphosa) यांनाही अज्ञाताकडून धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दक्षिण आफ्रीकेतील संडे टाईम्स या वृत्तसंकेतस्थळाने ही बातमी दिली आहे. या बातमीनुसार पोलीस धमकी देणाऱ्यांचा शोध घेत आहेत. या धमकीपत्रात शास्त्रज्ञांनी ओमीक्रॉनवरून नागरिकांमध्ये भीती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रामाफोसा यांनाही हे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात शास्त्रज्ञ ग्लेंडा ग्रे आणि प्रोफेसर तुलियो डि ओलिनिएयरा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तुलियो डि ओलिविएयरा क्वाजलू नटाल रिसर्च इनोवेशनचे प्रमुख आहेत. या पत्रामुळे सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत.

- Advertisement -

लस घेऊनही राष्ट्रपती कोरोना पॉझीटीव्ह
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत ट्विटरवर ही माहिती दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाफोसा यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. विशेष म्हणजे रामाफोसा यांनी कोवीडच्या दोन्ही डोस घेतलेले आहेत. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -