घरमहाराष्ट्रपालिका आयुक्त चहल ,सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत

पालिका आयुक्त चहल ,सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत

Subscribe

महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली खदखद

राज्यासह मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचीही चिंता वाढलीय. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीसुद्धा लॉकडाऊनचे संकेत दिलेत. त्यातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त आणि सनदी अधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत, अशी खदखद व्यक्त केली.

‘माय महानगर’शी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बातचीत केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सनदी अधिकारी आणि मुंबईचे महापालिका आयुक्त आम्हाला विश्वासात घेत नाहीत हे नक्की आहे. परंतु ते जरी घेत नसले तरी आमची जबाबदारी आहे. स्वतः आदित्य ठाकरे फिरताहेत. मी स्वतः फिरतेय. काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत; पण त्यांनी सांगावे म्हणून सतत रेटा लावणे त्यापेक्षा आम्ही कामावर जोर देत आहोत. ते विश्वासात घेत नाही हे खरे आहे. पण त्यांनी घ्यायला हवे. कारण तो त्यांच्या कामाचा एक भाग आहे. लोकशाहीमधला एक भाग आहे. ते घेत नसले तरी आम्ही जातोय. आम्ही स्वतः जाऊन त्या सगळ्या गोष्टी करतोय. तसेच त्या वेळेला काय कमी असेल तेही त्यांना निर्देश देतोय आणि ते पाळताहेत, असेही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

- Advertisement -

त्या म्हणाल्या, उद्धवजी कायम सांगत आहेत की आपल्याला लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. आपल्याला लॉकडाऊन करायचाच नाही. परंतु लोक स्वैर वागत आहेत. मुंबईकरांनी अनेक आव्हाने पेलली आहेत. अनेक आव्हाने त्यांनी परतवलीत. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या चार पटीने वाढतेय. आता चार पटीने वाढणार्‍या रुग्णांच्या संख्येला आळा घालायचा असेल तर आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे पाळायलाच हवीत. एसओपी काय आहे. एसओपी काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. दोन लसीचे डोस घेणे आवश्यक आहे. गर्दीत न जाणे हे जास्त जरूरी आहे. मास्क लावणे हे तर मस्ट आहे, असेही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

खाण्याच्या वेळेला सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणे या एवढ्या छोट्या गोष्टी जरी आपण पाळल्या तर आपण लॉकडाऊनपासून खूप लांब राहू. बरेचशे रुग्ण एक लस आणि दोन लस घेऊनही बाधित झालेले आहेत. ओमायक्रॉन घातक नाही, पण नियम पाळण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

इतर देशात ओमायक्रॉनचे रुग्ण दगावायलासुद्धा लागलेत. ते आपल्या देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईत व्हायला नाही पाहिजे. तर आपण सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नेत्यांकडे बघण्यापेक्षा ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यात राहिलो ना तरी आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो आणि तेच केले पाहिजे. आपल्या शेजारी बाहेरून कोण आले याकडे किमान लक्ष असावे आणि त्याची माहिती महापालिका किंवा पोलीस स्टेशनला देण्यात यावी. जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल. त्यांची चाचणी झाली असेल तर चांगलेच आहे. पण नसेल झाले तर त्यांची चाचणी करून त्यांना सोडले जाईल, असेही त्या म्हणाल्यात.

डिसेंबरमध्ये बाधित होणारी मुले 16 टक्के होती. 16 टक्क्यांमध्ये कधी वाढ होईल सांगता येत नाही. त्यामुळे खरेच मनापासून आम्ही समाधानी आहोत. मुंबई महाराष्ट्रातील बाळं सुरक्षित राहतील. वय वर्ष 15 ते 18 आपण व्हॅक्सिन देतोय. मुंबईमध्ये तर नऊ सेंटर आहे. लस घेताना त्याला ताप असता कामा नये, त्याला सर्दी असता कामा नये ही सगळी लक्षणे बघून त्यांना ती दिली जाईल. त्यांची नोंद राहील. जुने टॅब व्यवस्थित करून त्यांना देण्यात आलेले आहेत. नवी टॅबबद्दल मला माहिती नाही. परंतु तुमच्या माध्यमातून मला आता ती कळलीय. मी निश्चित आजच त्याचा संपूर्ण आढावा घेईन. जर चुकीचे असेल तर आपल्यासमोर आणेन, असेही त्यांनी जाता जाता सांगितलंय.

माझी जनता सुरक्षित राहिली पाहिजे
राजकारणी सगळेच सांगतायत वेगळे आणि करतायत वेगळे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जे सांगू तसे वागायला हवे, जसे मुख्यमंत्री स्वतः वागतायत, राजेश टोपे स्वतः वागतायत, अजित पवार स्वतः वागतायत. घाबरायचे नाही, काळजी घेणे आपल्या हातात आहे. गर्दी न वाढवणे हे आपल्या हातात आहे. मुख्यमंत्री म्हणजे लाखांचा पोशिंदा असतो, पोशिंदा म्हणजेच मुख्यमंत्री तर सुरक्षित राहिलेच पाहिजेत; पण माझी जनताही सुरक्षित राहिली पाहिजे हा त्यांचा सकारात्मक विचार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -