घरमहाराष्ट्रगतिमंद मुलीला चटके देऊन मारहाण; चाकण शिक्षण संस्थेतील प्रकार

गतिमंद मुलीला चटके देऊन मारहाण; चाकण शिक्षण संस्थेतील प्रकार

Subscribe

पुणे परिसरातील चाकणच्या वात्सल्य शिक्षण संस्थेत शिक्षकांनी गतिमंद मुलीला मारहाण आणि चटके दिल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी मारहाण झालेल्या मुलीच्या आईने चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेप्रकरणी शिक्षक विलास देवतरसे, वैशाली देवतरसे आणि शाळेचे केअर टेकर रेवन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा – CCTV: लिफ्टमध्ये लहान मुलीला बेदम मारहाण

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणच्या वात्सल्य शिक्षण संस्थेत चिंचवड येथे राहणारी १६ वर्षीय गतिमंद मुलगी शिक्षण घेत होती. तसेच तिचे तेथील व्यक्ती संगोपन करत होते. ती काही महिन्यांपासून तिथे शिक्षण घेत होती. ३८ वर्षीय आई आपल्या मुलीला भेटण्यासाठी चिंचवड येथून चाकणला जात असे. परंतु, प्रत्येकवेळी तिच्या अंगावर वेगवेगळ्या जखमा दिसत होत्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे आईने चाकण पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकांविरोधात फिर्याद दिली आहे.

हे वाचा – जवानांच्या शौर्याचंही मोदींकडून राजकारण – पवार

- Advertisement -

१६ वर्षीय गतिमंद मुलीचे हातपाय बांधून ठेवले जायचे. एवढेच नाही तर चटके देखील दिले जायचे. डोक्यावर हाता, पायावर आणि कपाळावर मारहाण झाल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. तर मुलीला जेवणातून आणि पाण्यातून झोपेचे औषध देऊन तिचा वेळोवेळी शारीरिक छळ झाल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कटोरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -