घरदेश-विदेशसमीर होता म्हणून मी तुरुंगातुन जिवंत बाहेर आलो - छगन भुजबळ

समीर होता म्हणून मी तुरुंगातुन जिवंत बाहेर आलो – छगन भुजबळ

Subscribe

राष्ट्रवादी कोंग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादी कोंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ भावनीक झालेत. कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात त्यांनी आपले अनुभव लोकांसमोर मांडले.

आज राष्ट्रवादी कोंग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात भावनिक भाषण करताना राष्ट्रवादी कोंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी “समीर होता म्हणून मी तुरुंगातुन सुखरूप बाहेर आलो माझे विरोधक नेहमी मला लक्ष्य करण्या करता समीरला सॉफ्ट टार्गेट करतात”, असे भावनिकरित्या मांडत समीर भुजबळ यांच्या काळातील विकासकामांची यादी सांगत त्यांची पाठराखंन केली. जेव्हा सेना बीजेपीच सरकार आलं तेव्हासुद्धा या छगन भुजबळने विरोधी पक्षाचं समर्थपणे नेतृत्व केल विविध मुद्द्यावर सरकारला धारेवर धरून सरकारला उत्तरदायी केल, गोपीनाथ मुंडेनी हे जाहीरपणे सांगितल होत कि भुजबळामुळे युतीची सत्ता गेली यामुळेच युती सरकार कायम छगन भुजबळानां लक्ष्य करते.

काय म्हणाले भुजबळ

“राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या सभेपासून ते नोंदणीपर्यंत पक्षासाठी समीरने भरीव कार्य केलय , जेव्हा नारायण राणेनी आणि शिवसेनेने पुन्हा एकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न १९९९ साली केला तेव्हासुद्धा आघाडीच्या आमदारांच्या संरक्षणाची जबाबदारी समीरने निभावली आणी आघाडीची सत्ता बचावली आणि हे विलासराव देशमुखांनासुद्धा माहिती होत , कृपाशंकराना माहिती आहे आणि आमच्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या पद्धतीने समीरने त्यावेळी व्युव्हरचना केली आणि काही आमदारांना इंदोरला पाठविले, बँगलोरला पाठविले अगदी सुरवातीपासून तो माझ्यासोबत आणि आघाडी सोबत समर्थपणे काम करतो म्हणूनच सामीर कायमच माझ्या विरोधकांच पाहिलं टार्गेट राहीला आहे. म्हणूनच जेव्हा माझ्यावर कुठलेही आरोप होतात तेव्हा पहिले आरोप समीरवर करायचे अस षड्यंत्र विरोधकांनी कायम रचल आहे , माझ्यासोबत त्यांनी समीरला अटक करून मला संपवण्याचा कट केला आणि हे करून ते इथेच थांबले नाही तर आज त्याचीच रेघ ते ओढत आहेत भुजबळाना कमजोर करायचं असेल तर समीरला कमजोर करा हे षड्यंत्र आहे …..या षडयंत्रामध्ये आम्हाला गुंतवलं आणि म्हणून माझ्यामुळे समीरला या षडयंत्राला समोर जाव लागत आहे.” – छगन भुजबळ

- Advertisement -

मी आजारी होतो तेव्हा समीरच माझी देखभाल करत होते

“मी आज तुमच्यासमोर खंबीरपणे उभा आहे कारण तुरुंगातून मी जिवंत बाहेर येऊ शकलो ते समीरमुळे आणि नाशिककरांच्या प्रेमामुळे तुरुंगात या सरकारने मला स्वतंत्र कोठडी दिली होती मी आजारी होतो तेव्हा समीर सगळी देखभाल करायचा तो सोबत होता म्हणून मला वेळेवर उपचार मिळाले अन्यथा या सरकारने कारस्थान केलेच होते भुजबळानां संपवायचे. समीरला लक्ष्य करण म्हणजे भुजबळांना लक्ष्य करण पण मी किंवा समीर असल्या कारस्थानांना पुरून उरू. जोपर्यंत कार्यकर्ते आणी नाशिकच्या जनतेच प्रेम सोबत आहे तो पर्यंत लढत राहू”, असेही भुजबळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -