घरमुंबईCCTV: लिफ्टमध्ये लहान मुलीला बेदम मारहाण

CCTV: लिफ्टमध्ये लहान मुलीला बेदम मारहाण

Subscribe

मानखुर्दमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीला लिफ्टमध्ये कोंडून एका महिलेने बेदम मारहाण केली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुरडीला लिफ्टमध्ये कोंडून एका महिलेने बेदम मारहाण केली आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेवर कारवाई करत तिला अटक केली आहे.

Shocking CCTV footage of a woman, who brutally assaulted a four year old girl inside lift for a Robbery

मुंबईतील धक्कादायक प्रकार ! चिमुरडीला केली महिलेने मारहाण, व्हिडिओ व्हायरलमुंबईतील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परीसरात एका महिलेने लिफ्टमध्ये ४ वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली. ७ ते ८ मिनिटे ती चिमुरडीला मारहाण केली.रिझवाना शेख असे या महिलेचे नाव असून ट्रॉम्बे पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Posted by My Mahanagar on Thursday, 15 November 2018

- Advertisement -

लिफ्टमध्ये मुलीला मारहाण

मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये बुधवारी दुपारी एक चार वर्षाची मुलगी लिफ्टमधून बिल्डिंगखाली खेळण्यासाठी जात होती. दरम्यान त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी रिझवाना शेख ही महिला लिफ्टमध्ये होती. या महिलेने थेट चिमुरडीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लिफ्ट कोणत्याच फ्लोअरला न थांबवता या महिलेने मुलीला मारहाण करत राहिले.

आरोपी महिलेला अटक

मारहाण करता करता ही महिला चिमुरडीच्या अंगावर बसली. हा मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मारहाणीमध्ये मुलगी जखमी झाली आहे. याप्रकरणी महिलेच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -