घरमहाराष्ट्रम्हाडा वर्षभरात बांधणार १५,७८१ घरे

म्हाडा वर्षभरात बांधणार १५,७८१ घरे

Subscribe

मुंबईत 4,623, तर नाशिकमध्ये 220 घरे

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा (म्हाडा) च्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या १०,७६४.९९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाने शुक्रवारी मंजुरी दिली. या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार म्हाडा चालू आर्थिक वर्षात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १५ हजार ७८१ घरे बांधणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ७०१९.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी मुंबईत ४, ६२३ घरे आणि नाशिकमध्ये 220 घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

म्हाडाचा सन २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२२-२०२३ च्या १०७६४.९९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास व सन २०२१-२०२२ च्या सुधारित ७९७६.७४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास शासनाच्या मान्यतेच्या अधीन राहून प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात २८८५.९२ कोटी रुपये तूट तर सन २०२१-२०२२ च्या सुधारित अर्थसंकल्पात १००९.०२ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -