घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील पेडर रोड येथील शाखेला एक निनावी ई-मेल आला असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. एनआयए आणि इतर तपास यंत्रणांकडून हा ई-मेल कुठून आला आणि मेल पाठवणारी व्यक्ती कोण, याचा कसून शोध घेतला जात आहे.

या ई-मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचे २० गट सक्रिय झाल्याचे म्हटले आहे. आरडीएक्सचा वापर करून स्फोट घडवून आणत घातपात करण्यात येईल, असे या मेलमध्ये म्हटले आहे. आपली ओळख उघड होऊन हा कट फसू नये, यासाठी ई-मेल केल्यानंतर आपण आत्महत्या करणार असल्याचेही संबंधित व्यक्तीने सांगितले आहे. ई-मेलमध्ये म्हटल्याप्रमाणे हल्ल्याची संपूर्ण योजना तयार झाली आहे. हा मेल पाठवणार्‍या व्यक्तीचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -