घरमहाराष्ट्रशहरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!

शहरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणी सोडले जात असताना शहरातील नेहरू नगर येथे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. रस्त्यावर पाणी साठल्याने नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागत होती.

कशामुळे फुटली अस सांगता येत नाही, पाईप लाईन खूप जुन्या आहेत, २५ ते ३० वर्षापूर्वीच्या आहेत. थंडी ही पडत आहे थंडीच्या दिवसात स्टीलचे पाईप असतात त्यातील विक ज्वाइंट निघतात. दुरुस्तीचे काम सुरू आहे.
– मकरंद निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारपासून दिवसाआड पाण्याची अंमलबजावणी महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक नाराज आहेत. यावर्षी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात मोठ्या प्रमाणावर जलसाठा आहे. तरी ही आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान, आज सकाळी नेहरू नगर येथील संतोषी माता चौका जवळ जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांनामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांना दिवसाआड पाणी दिल जात असताना अश्या घटना घडतातच कशा, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा –

महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर जाहीर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -