घरमहाराष्ट्रपक्षावर नाराज असलेले खडसे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत?

पक्षावर नाराज असलेले खडसे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत?

Subscribe

भाजप पक्षाला महाराष्ट्रात बळकट करणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव घेतले जाते. एकनाथ खडसे यांचे पक्षासाठी मौल्यवान योगदान राहिले आहे. मात्र, २०१४ साली भाजपची महाराष्ट्रात सत्ता आली आणि एकनाथ खडसे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या.

युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यामुळे एकनाथ खडसे शिवनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्या या भेटीनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘एकनाथ खडसे आमच्या नेहमी संपर्कात असतात’, असे विधान केले. त्यामुळे खडसे शिवसेनत प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेकांना खरी वाटत आहे. दरम्यान, याबाबत स्वत: एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिले.

एकनाथ खडसेंना मंत्रिपद?

एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करतील आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, खडसे यांनी या वृत्ताला फेटाळले. आदित्य ठाकरे आपल्याला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आले असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय आपला शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

- Advertisement -

खडसे यांचे भाजप पक्षासाठी मौल्यवान योगदान

भाजप पक्षाला महाराष्ट्रात बळकट करणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव घेतले जाते. एकनाथ खडसे यांचे पक्षासाठी मौल्यवान योगदान राहिले आहे. मात्र, २०१४ साली भाजपची महाराष्ट्रात सत्ता आली आणि एकनाथ खडसे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या आरोपांमुळे खडसे यांना महसूल मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून एकनाथ खडसे यांना पक्षाकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे. याबाबत खडसे यांनी वेळोवेळी नाराजी देखील जाहीर केली आहे. मात्र, ते अजूनही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी खडसे राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा होती. मात्र, खडसे यांनी भाजप पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -