घरमहाराष्ट्रMitkari on Awhad : चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या आव्हाडांनी...; मिटकरींचं आव्हाडांना प्रत्युत्तर

Mitkari on Awhad : चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या आव्हाडांनी…; मिटकरींचं आव्हाडांना प्रत्युत्तर

Subscribe

शरद पवार गटाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज जहरी टीका केली. अख्खा शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्याचे तुकडे तुकडे करुन टाकले. तुमच्यामुळे किती जण पक्ष सोडून गेले सांगा एकदा असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला.

मुंबई : राज्यातील राजकारणात आजचा दिवस म्हणजे आव्हाडविरुद्ध अजित पवार असाच रंगताना दिसत आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या जहरी टीकेनंतर दादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या आव्हाडांनी वेळीच आपलं थोबाड आवारावं असा इशारा मिटकरींनी आव्हाडांना दिला आहे. (Mitkari on Awhad In the name of movement with the twists and turns Mitkaris response to challenges)

शरद पवार गटाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज जहरी टीका केली. अख्खा शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्याचे तुकडे तुकडे करुन टाकले. तुमच्यामुळे किती जण पक्ष सोडून गेले सांगा एकदा असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला. तुमचे आणि छगन भुजबळांचे, प्रफुल्ल पटेलांचे किती सुमधूर संबंध होते ते का आम्हाला माहिती नाही? तरीही सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही सगळेजण एकत्र आलात तर रहा सोबत. पण उगीच शरद पवारांना डसण्याचा प्रयत्न करु नका, कारण बात निकलेगी तो दूर तक जायेगी असा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना दिला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर मिळालं आहे.

- Advertisement -

आव्हाडांच्या टीकेला उत्तर देताना आमदार मिटकरी म्हणाले की, जितेंद्र आव्हाड चळवळीच्या नावाखाली भामटेगिरी करणारी एक व्यक्ती आहे. हा भामटा माणूस आहे. या भामट्या माणसाला माझं जाहीर आव्हान आहे की, हिम्मत असेल तर अजित पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याची खुल्या व्यासपीठावर चर्चा होऊ द्या. तोडीसतोड उत्तराला उत्तर दिलं जाईल. अन्यथा जाहीर माफी मागा. ज्या पद्धतीने तुम्ही अजित पवारांबाबत बोलत आहात. त्यांच्या उपकाराखाली तुम्ही जगलात. त्यांच्या टाचेखाली जगलात. तुमची जहागीरी संपली, आता तुमची भामटेगिरी सुरू आहे. जितेंद्र आव्हाडांच्या सडक्या मेंदूतील हे विषारी विचार आहेत.

हेही वाचा : Dhangar Reservation : धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी हायकोर्टाने फेटाळली

- Advertisement -

पुरोगामी आणि चळवळीच्या नाखाली हा माणूस काय चाळे करतो, ज्या ज्या वेळी या आव्हाडांवर आरोप झाले. त्यावेळी अजित पवाराच या माणसाच्या पाठीशी उभा होता. आव्हाडांची जहागीरी गेली आहे. फुगेरी तेवढी बाकी आहे. मात्र, मुंब्रा, ठाण्यातील जनता आव्हाडांची जी फुगेरीगिरी लवकरच काढणार. मला माहिती आहे की, आव्हाडांनी पोसलेले गुंडे वेगवेगळ्या नंबरवरुन आम्हाला धमक्या देतात. पण आता आम्हीही त्याच पद्धतीनं उत्तर द्यायला तयार आहोत. अजित पवार आव्हाडांसारखे बोलघेवडे व्यक्ती नाहीत. कृतीशील बहुजनवादी नेता आहे.

हेही वाचा : Politics: नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, 2014 साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? मल्लिकार्जून खर्गेंचा घणाघात

महाराष्ट्राला दिशा देणार नेता आहे. आणि ते कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यामुळे चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या आव्हाडांनी आपलं थोबाड वेळीच आवरावं, अन्यथा जशास तसं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. आव्हाडात दम असेल, आव्हाड हिम्मत असेल तर त्यांनी खुली चर्चा करावी, महाराष्ट्राशी अजित पवारांनी काय केलं हे सांगायला आम्ही तयार आहोत. आणि तुझ्यासारखा मेंदूतील कीडा वळवळ करणारा तथाकथीत घाऱ्या डोळ्याचा पुरोगामी याला उत्तर देण्यास महाराष्ट्र सज्ज आहे. तर आज अजित पवारांवर केलेल्या टीकेला आम्ही वेळ आल्यावर उत्तर नक्कीच देणार असल्याचा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -