महाराष्ट्र काँग्रेसतर्फे आजपासून दोन दिवसाचे (ता. 16 फेब्रुवारी) चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. लोणावळ्यामध्ये राज्यस्तरीय चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या चिंतन शिबिराला उद्या (ता. 17 फेब्रु) नाना पटोले हे संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी आज पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथसला यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची भाषणे झाली.
लोणावळ्यात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ऑनलाइन केले.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकांऱ्यांना मार्गदर्शन केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिबिराच्या पहिल्या दिवशी काही गोष्टींवर आपले मत व्यक्त केले.
त्यांनतर नाना पटोलेंनी विविध विषयांवर भाष्य करत उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकांऱ्यांना संबोधित केले.
काँग्रेसच्या या दोन दिवसीय शिबिरात ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे ठराव मांडले.