घरमहाराष्ट्रMLA disqualification : फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर खलबतं सुरू; केंद्रीय मंत्र्यांसह DGP हजर

MLA disqualification : फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर खलबतं सुरू; केंद्रीय मंत्र्यांसह DGP हजर

Subscribe

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढील काही क्षणात जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर 9 जानेवारी रात्रीपासून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा ठाकरे गटाच्या बाजुने लागतो की, शिंदे गटाच्या बाजुने लागतो हे पुढील काही क्षणातच स्पष्ट होणार असल्याने या निकालानंतर मुंबईसह राज्यात काही संवेदनशील ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढील काही मिनिटांत लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल लाइव्ह वाचून दाखविणार आहे. यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री अनुराठ ठाकूर यांच्यात चर्चा सुरू आहे. तेव्हा 4.30 वाजता लागणाऱ्या निकालाआधीच या घडामोडी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. (MLA disqualification Fadnaviss Sagar bungalow starts uproar DGP present with Union Ministers)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढील काही क्षणात जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर 9 जानेवारी रात्रीपासून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा ठाकरे गटाच्या बाजुने लागतो की, शिंदे गटाच्या बाजुने लागतो हे पुढील काही क्षणातच स्पष्ट होणार असल्याने या निकालानंतर मुंबईसह राज्यात काही संवेदनशील ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व घटना घडामोडीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर डीजीपी रश्मी शुक्ला, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यात खलबतं झाली.

- Advertisement -

हेही वाचा : Kiran Mane यांनी Prabodhankar Thackeray यांच्यासाठी केली खास पोस्ट, म्हणाले – अशी आपली माणसं…

15 दिवस मनाई आदेश लागू

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही क्षण बाकी असताना पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘सागर’ निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे काल रात्री उशिरा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिंदे, फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यात बैठक पार पडली होती. त्यानंतर पुन्हा रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या आहेत. आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. नाशिक पोलिसांनी नुकतंच आजपासून 15 दिवस मनाई आदेश लागू केल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

बाळासाहेब भवनासह नार्वेकरांच्या घराची सुरक्षा वाढवली

आमदार अपात्रता निकालाला पुढील काही मिनिटांत जाहीर केल्या जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.सोबतच शिंदे गटाचं पक्ष कार्यालय असणाऱ्या बाळासाहेब भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये निकालाचं वाचन सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री यवतमाळ दौऱ्यावर तर आदित्य ठाकरे पाटणमध्ये

राज्यातील राजकारणात पुढील काही मिनिटांत मोठा फेरबदल होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भातील यवतमाळ दौऱ्यावर असून, त्यानंतर ते मराठवाड्यातील परभणीत सभा घेणार आहेत. तर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. तेव्हा दोन्ही गटासाठी हा एवढा मोठा दिवस असताना मुख्यमंत्री मुंबई बाहेर आहेत हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -