घरक्राइमGoa Murder Case : उच्चशिक्षित आईकडून 4 वर्षीय मुलाची हत्या; पोस्टमार्टमधून धक्कादायक...

Goa Murder Case : उच्चशिक्षित आईकडून 4 वर्षीय मुलाची हत्या; पोस्टमार्टमधून धक्कादायक खुलासा

Subscribe

गोवा : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील द माइंडफुल एआय लॅब कंपनीत सीईओ पदावर कार्यरत असलेल्या सूचना सेठ या महिलेने आपल्या 4 वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळावारी (9 जानेवारी) समोर आली होती. उच्चशिक्षित असलेल्या या महिलेने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. चार वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा, पोलिसांनी केला आहे. मात्र या हत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेळवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच आता मुलाच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. (Goa Murder Case 4 year old girl killed by highly educated woman A shocking revelation from the post-mortem report)

हेही वाचा – MLA Disqualification निकालाआधीच सरकारने जाहीर केला ‘आनंदाचा शिधा’; मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय

- Advertisement -

हिरीयुर तालुका रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. कुमार नाईक यांनी पत्रकारांना सांगितले की, मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. परंतु त्याचा गळा हाताने आवळून खून करण्यात आला होता असे दिसत नाही. ही घटना उशी किंवा अन्य काही साहित्याचा वापर करून घडल्याचे दिसते. त्यांनी सांगितले की, मुलाच्या अंगावर रक्त कमी झाल्याची किंवा कोणत्याही प्रकारची धडपड झाल्याचे चिन्ह नाही. मुलाचा मृत्यू 36 तास आधी झाला असून योग्य वेळ सांगता येऊ शकत नाही.

दरम्यान, द माइंडफुल एआय लॅबच्या सीईओ सूचना सेठ यांना सोमवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून गोव्यातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, सूचना सेठपासून वेगळा झालेला पती व्यंकट रमण याला त्यांच्या मुलाच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर तो मंगळवारी संध्याकाळी जकार्ताहून भारतात परतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – AUS VS WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; वॉर्नरच्या जागी ‘हा’ खेळाडू सलामीला

कोण आहेत सुचना सेठ?

सूचना सेठ हे ‘द माइंडफुल एआय लॅब’ची सीईओ आहेत. सोशल मीडिया अकाउंटनुसार, आरोपी महिला एआय एथिक्स एक्सपर्ट आणि डेटा सायंटिस्ट आहे. इंडस्ट्री रिसर्च लॅबमध्ये मशीन लर्निंग सोल्यूशन्स म्हणून 12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. याशिवाय एआय एथिक्सच्या यादीत 100 तेजस्वी महिलांमध्ये तिचा समावेश आहे. तसेच डेटा अँड सोसायटीमध्ये मोझिला फेलो, हार्वर्ड विद्यापीठातील बर्कमन क्लेन सेंटरमध्ये फेलो आणि रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च फेलो केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -