घरताज्या घडामोडीराज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही सुरू- रवी राणा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही सुरू- रवी राणा

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत नारायण राणे यांनी कानशिलात लगावण्याची भाषा केल्यामुळे राज्यात चांगलांच वादंग झाला. याप्रकरणी नारायण राणे अटक देखील करण्यात आली. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ठिकठिकाणी तक्रार दाखल केली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आमदार म्हणाले की, ‘आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हुकूमशाही सुरू आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे.’

नक्की काय म्हणाले रवी राणा?

रवी राणा म्हणाले की, ‘या राज्यामध्ये आता कायदा-सुव्यवस्था राहिला नाही आहे. कुठेतरी उद्धव ठाकरे यांची हुकूमशाही सुरू आहे. या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे अशी परिस्थिती या निर्माण झाली आहे.’

- Advertisement -

पुढे रवी राणा म्हणाले की, ‘अनिल परब हे परिवहन मंत्री आहेत. परिवहन मंत्र्यांनी शपथ घेताना कुठली गोष्ट गुप्त ठेवावी, अशाप्रकारची शपथ त्यांनी घेतली आहे आणि ते स्वतः सांगतात, उद्धव ठाकरेंनी हा निर्णय चांगला घेतला. सगळ्या शिवसैनिकांना नारायण राणे यांच्या घरावर जाऊन आंदोलन करायला सांगितलं. कायदा तोडायला सांगितला. असं जर अनिल परब राज्याचे शिवसेनेचे मंत्री सांगतात. तर मला असं वाटतंय, त्यांना कायद्याचा विसर पडला आहे. अनिल परब यांची ईडी चौकशी सुरू आहे. आज ईडीच्या घेरावात अनेक शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आहेत. अजूनपर्यंत ईडीने कारवाई का केली नाही हा देशासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे. ईडी वारंवार चौकशीला बोलावते पण त्यांना अटक करत नाही. धनाढ्य संपत्ती, ज्यांनी दोन नंबरचं काम केलंय, ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना सुद्धा ईडीने ताब्यात घेतले नाही. जेलमध्ये टाकत नाही. ज्यापद्धतीने राणेंच्या वक्तव्यावर इतका मोठा बाहू झाला. त्याला डोळ्यासमोर ठेवून ईडीने अनिल परबला अटक केली पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.’

आज बाळासाहेब ठाकरे असते तर….

‘आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कान पकडले असते. राणेंना दरोडे खोऱ्यासारखी वागणूक दिली त्याचा मी निषेध करतो,’ असे रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – भोकं पडलेला फुगा, बेडूक अशा उपमा राणेंना दिल्यामुळे रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -