घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरविकास निधीवरून सत्तेतील आमदार आमने-सामने; पालकमंत्र्यांना घातला घेराव

विकास निधीवरून सत्तेतील आमदार आमने-सामने; पालकमंत्र्यांना घातला घेराव

Subscribe

विकास निधी मिळत नाही हे कारण पुढे करत मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंड करत महाविकास आघाडी सरकारचे सरकार पाडले होते.

छत्रपती संभाजी नगर: आगामी 2024 च्या निवडणुका काही महिन्यांवरच येऊ घातल्या आहेत. तेव्हा आपल-आपल्या मतदार संघातील रखडलेले विकासकामे करून घेण्यावर आमदार-खासदार भरत देत असल्याचे चित्र आहे. असे जरी असले तरी मात्र, सत्ताधाऱ्यांकडूनच विकास निधी मिळत नसल्याची ओरड करत सत्तेतील आमदारच एकमेंकांवर धावत जात असल्याच्या घटना घडत आहेत. काल औरंगाबादमध्ये झालेल्या निधी वाटपाच्या राड्यानंतर आज जालन्यातही तशीच घटना घडली आहे.

विकास निधी मिळत नाही हे कारण पुढे करत मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंड करत महाविकास आघाडी सरकारचे सरकार पाडले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार वित्तमंत्री होते. तेच आम्हाला निधी देत नाहीत म्हणून शिंदे समर्थक आमदारांनी आरोप केले होते. त्यानंतर शिवसेना -भाजप असे सरकार स्थापन झाले खरे मात्र, आता पुन्हा त्याच निधी वाटपाचा मुद्दा गाजत आहे. काल औरंगाबादमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले होते. तर आज जालन्यात शिंदे समर्थक आमदारांनी भाजपचे अतुल सावे यांना घेराव घातल्याचे वृत्त समोर आले आहे. तेव्हा राज्यातील राजकारणामध्ये सध्या निधी वाटपाचा मुद्दाच राड्याला कारणीभूत ठरत आहे.

- Advertisement -

यावरून झाला जालन्यात राडा

जालन्यामध्ये सोमवारी डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिंदे समर्थक आमदारांनी नाराजी व्यक करीत निधी देताना अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. तर, विकास निधी मंजूर करत असताना शिंदे गटाच्या लोकांना डावलल्याचा आरोप करत शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, जिल्हा संपर्कप्रमुख पंडित भुतेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सावे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच घेराव घातला. विकास निधी देताना आमच्यावर अन्याय होत असून, असा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराच यावेळी दिला.

हेही वाचा : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्यावरून गुन्हा दाखल होण्याची शक्यता

- Advertisement -

खोतकर म्हणाले, सावेंचे असे वागणे बरे नाही

या राड्यानंतर शिंदे गटाचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर हे पालकमंत्री सावे यांची भेट घेण्यासाठी गेले असता यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. असे व्हायला नको होते, मात्र झाले. जे घडलं त्याचं समर्थन मी करत नसलो, तरीही सभ्यतेची भाषा पालकमंत्री यांनी ओलांडली आहे. असेही खोतकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Ranjan Gogoi : माजी सरन्यायाधीशांनी पहिल्याच भाषणात दिल्ली सेवा विधेयककावर मांडली भूमिका

वाद आता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात

विकास निधी देताना दुजाभाव होत असून, याची नोंद कागदोपत्री आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिली जाणार असल्याचं देखील अर्जुन खोतकर म्हणाले आहे. त्यामुळे आगामी काळात विकास निधीच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -