घरमहाराष्ट्रमराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक, दुकानदारांना दिला चार दिवसांचा अल्टिमेटम

मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक, दुकानदारांना दिला चार दिवसांचा अल्टिमेटम

Subscribe

महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असल्या पाहिजे, या मागणीला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कायमच आग्रही राहिला आहे. सुप्रीम कोर्टाने देखील याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, आता या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असल्या पाहिजे, या मागणीला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कायमच आग्रही राहिला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी यासाठी मनसेकडून आंदोलन देखील करण्यात आले आहे. पंरतु, याबाबतची सुप्रीम कोर्टाने देखील दखल घेतली होती आणि सर्व दुकानांवरील पाट्या 25 नोव्हेंबरपर्यंत मराठीत करण्याचा निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या आदेशाला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मनसे मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेकडून दुकानदारांना आता शेवटचा चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. याबाबतचे पोस्टर मनसेकडून चेंबूर स्टेशन परिसरात लावण्यात आले आहे. त्यामुळे मराठा पाट्यांचा वाद आता पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (MNS again aggressive on Marathi boards, gave four days ultimatum to shopkeepers)

हेही वाचा – Maharashtra Sadan Scam : …त्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगात गेले; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात मराठी पाट्या करण्यासंदर्भात 25 नोव्हेंबर पर्यंतची तारीख दिली होती. त्यामुळे आता याला केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मनसेने देखील पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील चेंबूर रेल्वे स्थानकाच्या परिसकात याबाबतचे पोस्टर लावण्यात आले आहे. “मराठी पाट्या करा नाही तर मनसेचा दणका… खळखट्याक…. शेवटचे चार दिवस! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात…” अशा आशयाचे पोस्टर चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे यांच्याकडून लावण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर देखील अद्यापही बहुतांश ठिकाणी तशा पाट्या लावण्यात आलेल्या नाही. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा, अशी कानउघडणी करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या दिसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे, असेही तेव्हा कोर्टाकडून सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही सर्व दुकानदारांनी याबाबतची कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याचेच पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

तर, ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. तसेच दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथले सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे पण लक्ष असेल हे विसरु नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिला होता. त्यामुळे आता 25 तारखेपर्यंत व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांवर मराठीत पाट्या लावल्या नाही तर मनसे आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -