घरताज्या घडामोडीCCTV: मशीदीमध्ये सीसीटीव्ही आहेत का ? नियमावलीची मनसेची मागणी

CCTV: मशीदीमध्ये सीसीटीव्ही आहेत का ? नियमावलीची मनसेची मागणी

Subscribe

मनसेच्या भोंग्याच्या वादावर राज्याचा गृह विभाग हा दिवसरात्र कामाला लागला आहे. राज ठाकरेंनी मशीदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्यासाठीचा महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर आता राज्याच्या गृह विभागानेही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय करायला सुरूवात केली आहे. भोंग्यांचा विषय देशभर गाजत असतानाच मनसेकडून आता CCTV च्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. मनसेने सीसीटीव्ही यंत्रणेच्या निमित्ताने सरकारला काही प्रश्न केले आहेत. तसेच सीसीटीव्हीच्या निमित्ताने सरकारने नियमावली तयार करण्याचेही आवाहन मनसेने केले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट करत आता मशीदीतही सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे.

काय आहे बाळा नांदगावकर यांचे ट्विट ?

जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? “सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशीदींमध्ये काय चालत ? असा सवाल केला होता. तसेच मुंब्र्यातील मशिदींमध्ये काय प्रकार घडतात असाही सवाल केला होता. त्यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रातील मशीदींमध्ये वस्तरा जरी सापडला तर राजकारण सोडेन असे प्रत्यूत्तर दिले होते. राज ठाकरे यांनी आव्हाडांच्या मुद्द्यावर बोलताना मुंब्र्यातून अटक झालेल्या दहशतवाद्याची यादी उत्तर सभेत सांगितली. त्यापाठोपाठ आता मनसेने सीसीटीव्हीच्या मुद्द्यावर मस्जिदीच्या निमित्ताने सवाल केला आहे. सर्वधर्मीय प्राथर्ना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये ? असा सवाल त्यांनी केला आहे. सर्वधर्मीय प्राथर्ना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये ? असा प्रश्न त्यांनी केला आहे. सरकारने या नियमांची नियमावली करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -