घरताज्या घडामोडीमोदी सरकारने भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण बनवावं अन् भोंगाबंदी बिहारपासून सुरु करा -...

मोदी सरकारने भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण बनवावं अन् भोंगाबंदी बिहारपासून सुरु करा – संजय राऊत

Subscribe

सध्या हिंदुत्वाच्या नावावर जो काही राजकीय भोंग्यांच्या विषय सुरु आहे, हे एक ढोंग आहे. हे ढोंग फार काळ चालणार नाही. यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. हिंदुत्वाविषयी लोकांच्यामध्ये शंका निर्माण होत आहेत. भोंग्यांच्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की त्यांनी देशभरासाठी राष्ट्रीय धोरण निश्चित करावं. दिशानिर्देश द्या, कायदा करा
सगळ्यात आधी या भोंगा बंदीची सुरुवात बिहारपासून सुरु करा, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भोंग्याचा वाद भाजपनं निर्माण केला आहे. आम्हाला कुणीही भोंग्यांबाबत अक्कल शिकवू नये. मुस्लिमांबाबतचे प्रश्न बाळासाहेबांनी चर्चेतून सोडवलेत, असं संजय राऊत म्हणाले. भोंग्यांच्यासंदर्भात राष्ट्रीय धोरण निश्चित करा. त्याची सुरुवात भाजपशासीत राज्यातून करा, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

- Advertisement -

दुटप्पी भूमिका चालणार नाही

तुम्ही गोवंश हत्याबंदीचा एक कायदा बनवला. त्यातून काही राज्यांनी पळवाट शोधली. इशान्यकडील राज्य गोवंश हत्या बंदी करायला तयार नाहीत. गोव्यासारखं राज्य जिथे तुमची सत्ता आहे ते देखील मानायला तयार नाहीत. अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका चालणार नाही, एक धोरण करा, असं संजय राऊत म्हणाले.

समाजविघातक दाखवून आमचा फोन टॅप केला

रश्मी शुक्ला तेव्हाच्या एसआयडी आयुक्त त्यांनी त्यावेळे ज्या-ज्या लोकांचे फोन टॅप केले आहेत, त्यांना समाजविघातक दाखवून केलं. कोणाला ड्रग्ज पेडलर्स, गँगस्टर दाखवलं. एकनाथ खडसे, मी, नाना पटोले…गृहखात्याकडून परवानगी घेताना ड्रग्ज पेडलर, गुंडांची टोळी चालवतोय असं सांगितलं. हे तेव्हा सुरु होतं जेव्हा महाराष्ट्रात २०१९ साली सरकार बनत होतं. आमच्यावर लक्ष ठेवून नवीन सरकार बनवण्याच्याबाबातीत आमची काय चर्चा सुरु आहे, याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. आमची गोपनियता भंग झाली. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून निष्पक्ष तपासाची आशा बाळगतो, तो अधिकारी राजकीय पक्ष, राजकीय नेत्याशी इमानदारी दाखवण्यासाठी केलं. त्यांना आता केंद्र सरकार सुरक्षा देत आहे. हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -