घरमहाराष्ट्रAmazon नोकर भरती जाहिरातीत मराठी भाषेचा समावेश नाही; मनसे आक्रमक

Amazon नोकर भरती जाहिरातीत मराठी भाषेचा समावेश नाही; मनसे आक्रमक

Subscribe

मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाने कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाला पत्र लिहून मराठी भाषेचा समावेश करण्याची केली मागणी

Amazon कंपनीने मेगाभरतीच्या ऑनलाइन प्रक्रियेत मराठी भाषा वगळ्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पक्षाच्या रोजगार विभागाने जाहिरात प्रक्रियेत इतर भाषांबरोबर मराठी भाषेचाही तत्काळ समावेश करण्यात यावा अशा आशयाचे लेखी पत्र कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाला (कस्टमर सर्व्हिस) पाठवले असल्याचे मनसे रोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी सांगितले.

Amazon ही ऑनलाइन सेवा पुरवणारी कंपनी त्यांच्या वी.सी.एस work from home options यात भरती करत असून देशातील विविध ठिकाणी सेवा केंद्र उघडत असताना पुण्यात देखील उघडणार आहे. असे असताना इतर भाषेंमध्ये नोकरीसाठी नोंदणी फॉर्म भरण्यासाठीचे पर्याय खुले आहेत. मात्र महाराष्ट्राची राजभाषा असणाऱ्या मराठीला वगळण्यात आल्याने मनसेने कंपनीला पत्र लिहून जाब विचारला आहे.

- Advertisement -

तुमचे गोडाऊन आमचे लॉक

या काळात कंपनी रोजगार उपलब्ध करत आहे ही स्वागताची बाब आहे. मात्र यात स्थानिक युवक आणि मराठी भाषेत व्यवहार होत नसतील तर त्याचे होणारे परिणाम देखील कंपनीने भोगायला तयार रहावे असा इशाराही मनसेच्या रोजगार विभागाने दिला आहे. येत्या सात दिवसात मराठी भाषेचा समावेश करा, तसे न केल्यास ‘तुमचे गोडाऊन आमचे लॉक’ असा सज्जड इशाराही मनसे रोजगार अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी दिला.


हेही वाचा – इकबालसिंह चहल महापालिकेचे आयुक्त की प्रशासक?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -