घरताज्या घडामोडीमनसेचा आता हलाल विरोधात लढा, सर्वसामान्यांना ‘नो टू हलाल’ मोहीम राबवण्याचे आवाहन

मनसेचा आता हलाल विरोधात लढा, सर्वसामान्यांना ‘नो टू हलाल’ मोहीम राबवण्याचे आवाहन

Subscribe

मुंबई – मशिदींवरील बेकायदा भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इस्लामिक पद्धतीने प्राण्यांची कत्तल करण्याच्या हलाल या पद्धतीवरून आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठा दहशतवादी फंडिंग आणि जागतिक स्तरावर सात ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या हलाल विरोधात आता लढा देण्याची गरज असल्याचे सांगताना मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सर्वसामान्यांना ‘नो टू हलाल’ मोहीम राबवण्याचे आवाहन शनिवारी येथे केले.

इस्लामिक पद्धतीने प्राण्याची कत्तल करण्यासाठी हलाल पद्धत आहे. प्राण्यांच्या हत्येचा हा क्रूरपणाचा मार्ग आहे. अलीकडच्या काळात हलाल पध्दतीने जनावरे मारण्याचा व्यवसाय तेजीत आला असून त्यामुळे जनावरांची विक्री करणारे खाटीक आणि वाल्मिकी समाज नामशेष होत आहेत. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय त्यांच्यापासून हिरावून घेतला जात आहे, परिणामी इतर धर्माच्या लोकांना हलाल पद्धतीने मांस कापून खावे लागत आहे. त्यामुळे हलालची मक्तेदारी मोडीत काढून वाल्मिकी आणि खाटीक समाजातील लोकांना पुन्हा व्यवसायात रुजू व्हावे हा या लढ्यामागचा मुख्य हेतू असल्याचे किल्लेदार यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

- Advertisement -

मांस व्यवसायासह इतर शाकाहारी उत्पादने जसे चिप्स, बिस्कीट, लिपस्टिक, चॉकलेट, आईस्क्रिम यात जमिय उलेमा ए हिंद या संघटनेचा हस्तक्षेप वाढला आहे. या उद्योगाच्या नफ्यातून काही भाग हा थेट दहशतवाद्यांना आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरले जातात. आपल्या कष्टाच्या पैशातून विकत घेतलेल्या वस्तूंचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी होत आहे, याची जाणीवही सर्वसामान्यांना नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हे थांबवले पाहिजे. म्हणूनच ‘नो टू हलाल’ मोहीम सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे किल्लेदार यांनी स्पष्ट केले.

बाजारात हलालचे मीट घेण्यावर दबाव वाढत आहे. मात्र झटका मीटवर विरोध होत आहे. हा विषय फक्त मांसाहारबाबत नाही. तर इतर पदार्थावरही हलालचे सर्टिफिकेशन वापरले जात आहे. यामागे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा छुपा हेतू असल्याचा आरोप किल्लेदार यांनी यावेळी केला.

- Advertisement -

हेही वाचा : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, ३ हजार ५०० गाड्या कोकणात जाणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -