घरमहाराष्ट्र'शिवसेना ही राष्ट्रवादीची 'ढ' टीम आहे'; आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मनसे नेते संदीप...

‘शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे’; आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मनसे नेते संदीप देशपांडेंचे प्रत्युत्तर

Subscribe

शिवसेना ही राष्ट्रवादीची 'ढ' टीम आहे. ज्या पद्धतीनं यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीनं विरप्पन गॅंग महापालिकेमध्ये सक्रिय आहे. आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे.

“मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण मला आता बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे”, अशी खोचक टीका राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज टाकरेंवर केली. त्यांच्या या टीकेनंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

“शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे. ज्या पद्धतीनं यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीनं विरप्पन गॅंग महापालिकेमध्ये सक्रिय आहे. आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय-काय केलं?, कुठे-कुठे पैसे खाल्ले?, या ईडी रोज हिशोब मागते आहे. त्यामुळं सर्वातआधी या सगळ्याचा ईडीला हिशोब कसा द्यायचा यावर आदित्य ठाकरे यांनी लक्ष्य द्यावं. आमच्याबद्द्ल बोलण्याची गरज नाही. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. तुमच्या पुढे जी वेळ आलीये. तुम्हाला जे ईडीला हिशोब द्यायचे त्याचा विचार करा”, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -

यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ”ज्या पद्धतीनं शिवसेनेनी भाजपाबरोबर युती केली आणि त्यानंतर राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक लढवली. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर एकमेकांच्या मांडीवर जाऊन बसले. राष्ट्रवादी भाजपाबरोबर दोन दिवसांचं सरकार स्थापन करते. एवढा लोकसाक्षीने विचार करून जर यांना प्रश्न विचारले, तर यांना राग येतो आणि आमच्या नुसत्या अफवा उटल्या तरी यांना मिरच्या झोंबतात”, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

- Advertisement -

“मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण मला आता बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे. आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. भाजपाचं राजकारण पाहिलं तर ज्या राज्यात सत्ता पाहीजे त्या राज्यात या दोन्ही पक्षांना वापरुन, एकमेकांविरोधात बोलून, काही घटना घडवून, हिंदू मुस्लिम दंगली घडवून सरकार स्थापन कसं करायचं याकडे लक्ष दिसत आहे. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं. कुठेही आपल्या राज्यात वाद वाढू नयेत. संवादानी पुढे जावं यासाठी महाराष्ट्राने लक्ष दिलं पाहिजे. हिंदुत्वासाठी सतत लढण्याची गरज नसते. राजकीय पक्ष म्हणून जी वचनं देतो ती पूर्ण करणंही हिंदुत्व आहे”, आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.


हेही वाचा – “मनसेला मी आधी टाइमपास टोळी म्हणायचो, पण आता…”; राज ठाकरेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचे उत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -