घरमहाराष्ट्रमोदी एक्स्प्रेस कोकणाच्या दिशेने रवाना; मंगल प्रभात लोढांनी दाखवला हिरवा कंदील

मोदी एक्स्प्रेस कोकणाच्या दिशेने रवाना; मंगल प्रभात लोढांनी दाखवला हिरवा कंदील

Subscribe

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी हिरवा कंदील दाखविल्या नंतर ती ट्रेन चाकरमान्यांना घेऊन कोकणाच्या दिशेने रवाना झाली.

गणेशोत्सवाला आता अवघे काहीच दिवस राहिले आहेत. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी शुद्ध सुरु झाली आहे. कोकणातला गणेशोत्सव म्हटलं की त्याची एक वेगळीच ओढ असते. गणेश चतुर्थीचे दिवस जवळ आले की मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना त्यांचं कोकणातलं गाव साद घालू लागतं. त्याचबरोबर कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्यातील अनेकांना ट्रेन च्या तिकिट्स मिळत नाहीत. किंवा काही वेळा कन्फर्म तिकीट घेण्यासाठी ज्यादा पैसे अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. म्ह्णूनच कोकणात जाणाऱ्या गणेश भाक्तांसाठी ‘मोदी एक्सप्रेस’ ही विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली होती. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा(mangal prabhat lodha) यांनी हिरवा कंदील दाखविल्या नंतर ती ट्रेन चाकरमान्यांना घेऊन कोकणाच्या दिशेने रवाना झाली.

हे ही वाचा – गणेशोत्सवासाठी मुंबई भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना

- Advertisement -

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. मुंबई भाजपाच्या(mumabi bjp) वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली. दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी हिरवा कंदिल दाखवला. मोदी एक्सप्रेसमधून एकूण 1800 प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले. या उपक्रमासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड(prasad lad), महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा – कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीची सवलत; पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध

- Advertisement -

मुंबईमधून मोठ्या संख्येने चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली आहे. गतवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली होती. त्याला कोकणवासीयांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरणमान्यांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या एक्स्प्रेसचा गेल्या वर्षी अनेक प्रवाशांनी लाभ घेतला. दरम्यान यंदाही मुंबई भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली आहे. गणेशभक्तांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या(narendra modi) संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. “राज्यात गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. मोदी एक्सप्रेस या रेल्वेमुळे कोकणवासी खूश आहेत,” असं मत राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा – मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणांचा पाहाणी दौरा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -