घरठाणेमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Subscribe

ठाणे – राज्यात काही दिवसांपासू गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होतना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात 16 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. कलम 376 (डी) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारपोली पोलिस ठाण्याकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात महिनाभरात दोन घटना –

- Advertisement -

काही दिवसांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी 15 वर्षीय परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. 10 ऑगस्टला अशाच एका घटनेची पुनरावृत्ति पुण्यात झाली. 7 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार घडला. पुण्यात महिनाभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत.

भंडाऱ्यातही महिलेवर अत्याचार –

- Advertisement -

दरम्यान मदतीचे आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली होती. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्री बहिणीचे घर सोडले. गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्याच्या बहाण्याने ती निघाली होती. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. मात्र, आरोपीने तिला घरी सोडले नाही. गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने दुसऱ्या दिवशीही 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीने पळ काढला होता.

यानंतर पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या (आरोपी 2) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडितेवर अत्याचार केले. आरोपीने आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -