घरमहाराष्ट्रऐतिहासिक मूर्तीचा शोध घेण्यासाठी अधिक पोलीस बळाचा वापर करा, अंबादास दानवे यांची...

ऐतिहासिक मूर्तीचा शोध घेण्यासाठी अधिक पोलीस बळाचा वापर करा, अंबादास दानवे यांची मागणी

Subscribe

जालना – गेल्या सात दिवसांत पोलिसांना मूर्ती व चोरांचा शोध घेण्यास अपयश आले आहे. इतक्या दिवसांत चोरीस गेलेल्या मूर्ती सापडायला हव्या होत्या, असे खडे बोल सुनावत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस तपासावर असमाधान व्यक्त करत ताशेरे ओढले.

जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मगाव असलेल्या जांब समर्थ गावातील पुरातन काळातील ऐतिहासिक मूर्तींची चोरी झालेल्या राम मंदिराला आज विरोधी पक्षनेते दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

हेही वाचा काँग्रेसचा अजून एक नेता झाला आझाद, एका बड्या नेत्यांचा राजीनामा

पोलीस तपास कुठपर्यंत आला याची माहिती त्यांनी घेतली व आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले. चोरी झाल्यावर विधानपरिषदेत यावर आम्ही आवाज उठवला होता. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. समर्थ रामदास स्वामी यांचे विचार मानणारे गावातील तसेच बाहेरील नागरिक यांच्या भावना यात जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे सरकारने यात जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आम्ही योग्य मार्गाने सोडवू, असे देखील दानवे यांनी म्हटले.

- Advertisement -

चोरीस गेलेल्या पुरातन काळातील ऐतिहासिक मूर्तींचा शोध घेण्यासाठी अधिक पोलीस बळाचा वापर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी समर्थांचे वंशज भूषण महारुद्र स्वामी, पुजारी व स्थानिक गावकरी यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

हेही वाचा – …त्यांच्याकडे दोन कोटी आले; त्यांची काम झाली असे नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटलांचा विरोधकांना टोला

यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख, शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्क प्रमुख हिकमदादा उढान,माजी आमदार शिवाजीराव चौथे, जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे,भास्कर राव अंबेकर, तालुकाप्रमुख उद्धव मरकड,पुजारी धनजंय देशपांडे, समर्थ वंशज भुषण स्वामी,जामसमर्थ गावचे सरपंच बाळासाहेब तांगडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -