घरCORONA UPDATEमोदींनी मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर करावे - संजय राऊत

मोदींनी मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर करावे – संजय राऊत

Subscribe

मुंबईसाठी वेगळे आर्थिक पॅकेज जाहीर केले पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले असून, याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले असून, आता मुंबईसाठी वेगळे आर्थिक पॅकेज जाहीर केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. लाखो मजुरांनी मुंबईतून स्थलांतर केले असून, मुंबईत त्यांचे पोट भरत नसल्याने ते आपापल्या राज्यात निघून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी मुंबईसारख्या शहरांचे महत्त्व टिकवणं गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान देशाच्या आर्थिक राजधानीचे महत्त्व टिकवणे महत्त्वाचे आहे.  त्यामुळे मुंबईचे आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुंबईतून २० ते २५ क्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभे रहावे

नरेंद्र मोदींनी देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाचे मोठे संकट असल्याने सध्या टीका करणे योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान लॉकडाऊन चार संबंधी सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवला जावा अशी भूमिका मांडल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -