घरCORONA UPDATEमहापालिकेसाठी खासगी डॉक्टरांच्या सेवा घ्या - अश्विनी भिडे

महापालिकेसाठी खासगी डॉक्टरांच्या सेवा घ्या – अश्विनी भिडे

Subscribe

घरोघरी जावून तापाचे व वयोवृध्द रुग्ण शोधून काढण्याचे निर्देश देताना खासगी डॉक्टरांची महापालिकेच्या सेवेसाठी मदत घेतली जावी,

महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी परिमंडळ पाचमधील अलगीकरण केंद्रातील सामुदायिक स्वयंपाकगृहाची पाहणी करत जेवणाचा दर्जा तपासला. तसेच घरोघरी जावून तापाचे व वयोवृध्द रुग्ण शोधून काढण्याचे निर्देश देताना खासगी डॉक्टरांची महापालिकेच्या सेवेसाठी मदत घेतली जावी, अशाही सूचना त्यांनी महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना दिल्या.

महापालिकेच्या ‘परिमंडळ ५’साठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी प्राजक्ता लवंगारे यांच्यासह पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी एम-पूर्व, एम-पश्चिम तसेच एल विभागातील ‘कोरोना कोविड १९’ विषयक सेवा सुविधांची व परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व आढावा घेतला. या पाहणी दरम्यान त्यांनी चेंबूर परिसरातील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रातील सामुदायिक स्वयंपाक घरास (कम्युनिटी किचन) भेट देऊन तेथील व्यवस्थेचीही पाहणी केली. त्याचबरोबर तेथील कामगारांशी संवाद साधण्यासह तिथे बनवलेल्या जेवणाचा दर्जाही त्यांनी स्वतः जाणून घेतला.

- Advertisement -

खासगी डॉक्टरही महापालिकेच्या सेवेत

या पाहणी दरम्यान व आढावा बैठकीदरम्यान ‘परिमंडळ पाच’च्या परिसरातील सर्व सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण हे सातत्याने करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच परिसरातील खासगी डॉक्‍टरांच्या सेवा महापालिकेच्या सेवेसाठी अधिग्रहित करण्यात याव्यात, असेही निर्देश या पाहणी दौरा दरम्यान व आढावा बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.

- Advertisement -

तसेच विभागस्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण व वयोवृद्ध रुग्ण यांना शोधून त्यांना आवश्यक त्या उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘परिमंडळ पाच’ मध्ये असणाऱ्या महापालिकेच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये ‘कोरोना कोविड- १९’बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व इतर रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्याचे निर्देशही आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत. या पाहणी दौऱ्यास व आढावा बैठकीस ‘परिमंडळ ५’चे सह आयुक्त भारत मराठे, परिमंडळ क्षेत्रातील मनिष वळंजू, पृथ्वीराज चौहान, सुधांशू द्विवेदी या तीन प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्तांसह  संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -