घरमहाराष्ट्रमागील २४ तासांत राज्यात सापडले सर्वाधिक २३४७ रुग्ण

मागील २४ तासांत राज्यात सापडले सर्वाधिक २३४७ रुग्ण

Subscribe

६३ रुग्णांचा मृत्यू

राज्यात रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक २३४७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. तसेच ६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११९८ इतकी झाली आहे. तर ६०० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७६८८ कोरोनाबाधित रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

सलग तीन दिवस दीड हजारपेक्षा अधिक रुग्ण राज्यात सापडत असताना रविवारी थेट दोन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला. २४ तासांत दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडणे ही राज्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात ६३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये मुंबईतील ३८, पुणे ९, औरंगाबाद ६, सोलापूर ३, रायगड ३, आणि ठाणे १, पनवेल १,लातूर १, तसेच अमरावती १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. तर ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,७३,२३९ नमुन्यांपैकी २,४०,१८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३,०५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात सध्या १६८८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,९७२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६३.८३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ३,४८,५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७,६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मार्चच्या तुलनेत १३ पट वाढ
कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढे होते, ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतके वाढले आहेत. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -